Pippa Actor Anuj Singh Duhan esakal
मनोरंजन

Pippa Actor Anuj Singh Duhan : 'सैन्यातील लोकांना...' पिपाच्या अभिनेत्यानं दिली परखड प्रतिक्रिया

पिपा या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Pippa Actor Anuj Singh Duhan : पिपा या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यातील कथा, प्रसंग, कलाकार यांच्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. बॉक्स ऑफिसवर भलेही या चित्रपटानं फारशी कमाई केली नसल्याचे दिसून आले आहे.

आता पिपा या चित्रपटातील अभिनेता अनुज सिंग दुहाननं दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे. अनुजनं लेफ्टनंट तेजिंदर सिंग सिद्धूची भूमिका केली आहे. त्यात त्यानं केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. राजा कृष्णननं मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाकडे समीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. अनुजनं फ्री प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीतनं चर्चेला उधाण आले आहे. या चित्रपटामध्ये इशान खट्टकची देखील महत्वाची भूमिका आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

अनुजनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, पिपामध्ये वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळणे ही आनंदाची बाब होती. त्या भूमिकेनं खूप काही शिकायला मिळाले. भारतीय सैनिक, त्यांचे जीवन, त्यांचा संघर्ष हे सारं जवळून अनुभवता आले. आपल्याला ऐकून किंवा वाचून सैनिक यांच्याविषयी माहिती असते. आपण जेव्हा त्यांच्या भूमिकेत जगतो तेव्हा कळते की ते किती कठीण आहे.

पिपा करत असताना खूप साऱ्या आठवणी आहेत. मी ज्या लेफ्टनंट यांची भूमिका साकारली आहे त्यांचे आय़ुष्य आणि प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या. मुळचा हरियाणाचा असणाऱ्या अनुजनं जेव्हा त्याला या चित्रपटाविषयी काय तयारी करावी लागली असे विचारण्यात आले तेव्हा त्यानं सांगितलेला प्रवास थरारक होता. जवान आणि त्याची देहबोली, त्याचा दृष्टिकोन हे सारं शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

सैनिकांना बऱ्याचदा त्यांच्या परिस्थितीनुसार, समोर येणाऱ्या प्रसंगानुसार भावनांच्या बदलांना सामोरं जावे लागते. काहीवेळा ते फार रोबोटिक वाटते किंवा त्यांना भावनाच नाहीत असेही त्यांना दाखवावे लागते. पण तो त्या परिस्थितीचा भाग आहे. तो त्यांच्या कार्यशैलीतील बदल आहे त्याचा त्यांना स्विकार करावा लागतो. असेही अनुजनं यावेळी सांगितले.

आपल्या सैनिकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे आपल्याला घरबसल्या कळत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्या भावना किंवा संवेदना नसतात असे म्हणणे चूकीचे आहे. याउलट त्यांना फार वेगळ्या मानसिकतेचा सामना करावा लागतो. त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. अशा शब्दांत अनुजनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT