Piper Laurie oscar nominated actress passed away at the age of 91 SAKAL
मनोरंजन

Piper Laurie: ऑस्कर नामांकित अभिनेत्री पाईपर लॉरी यांचं निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाईपर लॉरी यांच्या निधनाने हॉलिवूड मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे

Devendra Jadhav

Piper Laurie Passed Away News: तीन वेळा ऑस्कर नामांकित आणि एमी विजेती अभिनेत्री पायपर लॉरी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

यूएस-आधारित मीडिया आउटलेट डेडलाइननुसार, पाइपर लॉरी यांचे शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

तीन वेळा ऑस्करसाठी मिळाले होते नामांकन

पाईपर लॉरी या हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांना नऊ वेळा एमी आणि तीन वेळा ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

'ट्विन पीक्स' या लोकप्रिय शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. रिपोर्ट्सनुसार, या शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 1990 आणि 1991 मध्ये एमीसाठी नामांकन मिळाले होते.

वयाच्या १८ व्या वर्षी केलेली अभिनयाची सुरुवात

पाईपर लॉरीने यांनी वयाच्या १८ व्या वर्षी युनिव्हर्सल-इंटरनॅशनल सध्याच्या युनिव्हर्सल स्टुडिओ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

पाईपर लॉरीने रोनाल्ड रीगन, रॉक हडसन, टोनी कर्टिस आणि न्यूमन अशा लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले. ऑस्कर नामांकित अभिनेत्री पाइपर लॉरी शेवटच्या 2018 मध्ये 'व्हाइट बॉय रिक' या सिनेमात चित्रपटात दिसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT