PM Narendra Modi On Hindi Movie : २८ मे रोजी संसदेच्या नवीन भवनाचं उद्धाटन होणार आहे. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत लोकांना अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.
थोडा वेळ त्यांना मिळतो त्यात ते काय करतात. ते सिनेमे पाहतात की गाणी ऐकतात? चला जाणून घेऊया याविषयी (PM Narendra Modi All time Favourite Movie and he always listen to this song of lata mangeshkar)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते. तेव्हा माहित पडलं की सध्या ते कामामध्ये सतत व्यस्त असतात. पण आधी ते सिनेमासाठी थोडा तरी वेळ काढायचे आणि गाणी देखील ऐकायचे.
जेव्हा अक्षय कुमारनं राजकारणाच्या पलिकडे जाऊन पंतप्रधानांना प्रश्न केला होता की ते सिनेमे पाहतात का. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देत पंतप्रधान म्हणाले होते की त्यांना सिनेमा पहायला वेळ नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जुना किस्सा सांगत म्हटलं होतं की एकदा अमिताभ बच्चन गुजरात मध्ये आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या दरम्यान अमिताभ यांनी पंतप्रधानं मोदी यांना 'पा' सिनेमा पाहण्यास सांगितले होते.
'पा' व्यतिरिक्त पंतप्रधानांनी 'ए वेडनेसडे' देखील पाहिला आहे, पण तुम्ही हे कळल्यावर हैराण व्हाल की त्यांचा आवडता सिनेमा यापैकी कोणताच नाही तर पंतप्रधानांना ५७ वर्ष जुना एक सिनेमा प्रचंड आवडतो.
लडाख,सिक्किम आणि जम्मू काश्मिरच्या मुलांशी संवादा दरम्यान पीएम मोदी यांनी सांगितलं की ते देव आनंद यांचे चाहते आहेत. त्यांचा 'गाइड' सिनेमा आपला ऑल टाइम फेव्हरेट आहे. पंतप्रधान मोदी असं देखील म्हणाले होते की जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते गाणी देखील ऐकतात.
लता मंगेशकर त्यांच्या आवडत्या गायिका होत्या. आणि 'ओ पवन वेग से उडने वाले घोडे है..' हे त्यांचे आवडते गाणे. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. याव्यतिरिक्त 'ज्योति कलश छलके' हे देखील गाणं पंतप्रधानांचे आवडते गाणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.