Pathaan News: शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण सिनेमा जगभरात गाजतोय. शाहरुखच्या फॅन्सनी पठाणचं खुप कौतुक केलंय. याशिवाय एकदा नव्हे तर अनेकदा थियेटरमध्ये जाऊन शाहरुखच्या फॅन्सनी पठाण बघितलाय. पठाण ४०० कोटी क्लब मध्ये दाखल झालेला पहिला सिनेमा ठरलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पठाण आवडला असून त्यांनी संसदेत सर्वांसमोर पठाणचं कौतुक केलंय.
(PM Narendra Modi also praised Shahrukh's Pathan)
शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास चांगले संबंध आहेत. त्यामुळे ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असलेल्या शाहरुख खानच्या पठाण बद्दल मोदींची प्रतिक्रिया काय याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अखेर मोदींनी पठाण बद्दल मौन सोडलं आहे. संसदेत सर्व राजकीय नेत्यांसमोर मोदींनी पठाणचं कौतुक केलं. मोदी पठाण बद्दल थोडक्यात पण महत्वाचं बोलले
शाहरुखच्या पठाण निमित्ताने काश्मीर मधील श्रीनगर येथील INOX राम मुन्शी बाग थियेटर तब्बल ३२ वर्षांनी हाउसफुल झालं. पठाण पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी तीन दशकांनंतर हाउसफुल्ल गर्दी केली. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी पठाण हाऊफुल्ल होणं हि फार मोठी गोष्ट होती. मोदींनी याच गोष्टीचा उल्लेख करत शाहरुखच्या पठाण चं कौतुक केलंय
लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी पठाणच्या जगभरातील यशाबद्दल अभिमानाने उल्लेख केला. मोदी म्हणाले की, "श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत." मोदी कौतुक करत असतानाच लोकसभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनीही या गोष्टींचं बेंच थोपटत कौतुक केलं.
याआधी मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना बॉलीवूड सेलिब्रिटी आणि सिनेमांबद्दल अनावश्यक टिप्पणी करू नका असे सांगितले होते. पठाण विरोधात भारतात जे नकारात्मक वातावरण तयार झाले होते याशिवाय पठाण बॉयकॉट करण्याची मागणी सुरु होती, त्याचा मोदींनी निषेध केला होता.
सध्या भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत. २५ जानेवारीला रीलीज झालेला पठाण शाहरुख खानच्या करीयरमधला अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.