PM Narendra Modi mopped the Kala Ram temple  esakal
मनोरंजन

Prakash Raj : मोदींनी काळाराम मंदिरात केली स्वच्छता, अभिनेता प्रकाश राज यांचा संताप! 'हे असं करणं म्हणजे...'

युगंधर ताजणे

PM Narendra Modi mopped the Kala Ram temple : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिकमधील काळाराम मंदिरात केलेल्या स्वच्छतेचा फोटो व्हायरल झाला अन् वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले. त्यावर सोशल मीडियातून आलेल्या प्रतिक्रियाही उलट सुलट पद्धतीच्या आहेत. आता त्यात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेची भर पडली आहे.

आपल्या परखड आणि टोकदार वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते म्हणून प्रकाश राज यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. ते एक लोकप्रिय अभिनेते तर आहेच या शिवाय ते सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारे अॅक्टिव्हिस्टही आहेत. त्यांच्या पोस्ट बऱ्याचदा वादाचा विषय असतात.

आपल्याला कोण काय बोलते, यापेक्षा आपल्याला एखाद्या विषयाबाबत काय वाटते यावर प्रकाश राज यांचा जास्त भर असल्याचे दिसते. त्यांनी यापूर्वी देखील मोदी यांच्यावर अनेकदा निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा ते त्यांच्या मोदींवरील ट्विटमुळे चर्चेत आले आहेत.

मोदी यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात स्वच्छता करतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. यावेळी त्यांनी तो फोटो पोस्ट करताना भाविकांना आणि नागरिकांना देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता ठेवावी. असे आवाहनही केले होते. स्वच्छता अभियनाचा संदेश त्यांनी त्या निमित्तानं दिला होता.

प्रकाश राज यांनी एक्सवर शेयर केलेल्या त्या पोस्टमध्ये मोदी यांचा हा राजकीय विषय असल्याचे म्हटले आहे. मोदींच्या राजकारणाचा हा एक भाग आहे. तुम्हाला काय दिसत नाही का, अशी स्वच्छता करुन तुमचे मत मागण्याचा हा प्रकार आहे? प्रकाश यांची ती पोस्ट चर्चेत आली असून त्यावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे.

अनेक युझर्सनं प्रकाश राज यांच्यावर आगपाखड केली आहे. त्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहे. मोदींकडे मागण्यासारखं काहीतरी आहे. तुमच्याकडे काय आहे, असं एका युझर्सनं प्रकाश राज यांना विचारलं आहे तर दुसऱ्यानं तुम्ही दरवेळी अशा प्रकारची टीका करुन नेमकं काय सांगू पाहता? असा प्रश्न केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir Election: मोदींमुळे पाक सीमेवर शांतता, अमित शहा यांचा दावा; काश्‍मीरमधील घराणेशाहीवर टीका

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल

Tractor Subsidy: ट्रॅक्टर अनुदान पाच लाखांपर्यंत वाढले? अफवा की सत्य? कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले काय आहे खरं

Anganwadi Workers: शिंदे सरकारची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर

SCROLL FOR NEXT