Poonam Pandey Death news Fake esakal
मनोरंजन

Poonam Pandey Alive : 'मी जिवंत आहे', पूनम पांडेने मागितली माफी, व्हिडिओ बनवून सांगितलं कारण

युगंधर ताजणे

Poonam Pandey Death News fake new video : जे व्हायचं तेच झालं पूनमनं चाहत्यांसोबत मोठा प्रँक केल्याचे दिसून आले आहे. कालपासून पूनमचं निधन झाल्याच्या बातम्यांना मोठे उधाण आले (Poonam Pandey Alive fact chheck) होते. सर्व्हिकल कॅन्सरनं तिचं निधन झाल्याचे बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे तिच्या फॅन्सला मोठा धक्का बसला होता. तरीही अनेकांनी त्यावरुन काही (Poonam Pandey Cervical Cancer) प्रश्न उपस्थित केले होते.

या सगळ्यात आता पूनमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तिनं मी (Poonam Pandey New Video Viral) जिवंत असल्याचे सांगितले आहे. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी पूनमला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. (Poonam Pandey Latest Updates) कित्येकांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे.

दरम्यान सोशल मीडियावर पूनमच्या निधनबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात (Poonam Pandey Latest Marathi News) आल्या होत्या. त्यात आता पूनमनं आपण गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्याविषयी आपण हे असे कृत्य केल्याचे पूनमनं म्हटले आहे. या सगळ्यात तिच्या बॉडीगार्डची प्रतिक्रियाही समोर आली होती त्यात तिनं आपण तिच्या बहिणीशी संपर्क साधत असून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे म्हटले होते.

पूनमच्या कुटूंबियांनी त्यांचे फोन बंद करुन ठेवले होते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. यामुळे वेगवेगळ्या अफवांना उधाण आले होते.

पूनम पांडेच्या निधनानंतर आता वेगवेगळ्या चर्चां सुरु झाल्या होत्या. वयाच्या अवघ्या ३२ (Poonam Pandey Death) व्या वर्षी पूनमचा मृत्यू झाल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता तिच्या नव्यानं व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. खरं तर पूनमच्या पीआर टीमनं इंस्टावर पोस्ट (Poonam Pandey Latest News) शेयर केला होता. त्यात त्यांनी गर्भाशयाच्या कॅन्सरनं तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यावरुन सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते.

मी काही त्या सर्व्हिकल कॅन्सरनं पीडित नव्हते. मात्र त्या आजाराचा सामना कित्येक महिला करताना दिसतात. हजारो महिलांना त्याला सामोरे जावे लागते. त्या आजाराविषयी पुरेशा प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशातून आपण हे पाऊल उचलल्याचे तिनं म्हटले आहे. हा आजार बरा होऊ शकतो. मात्र त्याविषयी पुरेशी जनजागृती नसल्याचे दिसून आले आहे.

पूनमनं तिच्या पोस्टमध्ये तो आजार आणि त्याविषयी काय करता येईल याबाबत माहिती दिली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच त्या आजारावर मात करता येईल असे त्या पूनमनं म्हटले आहे. या सगळ्यात त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT