Poonam Pandey  esakal
मनोरंजन

Poonam Pandey Post : सत्य समोर येण्यापूर्वीच पाठवली कायदेशीर नोटीस! पूनम पांडेच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

पूनम पांडे पुन्हा तिच्या नव्या पोस्टमुळे (Poonam Pandey New Post चर्चेत आली आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Poonam Pandey New Post : टीव्ही मनोरंजन, चित्रपट अन् रियॅलिटी शो मधून नेहमीच आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करणाऱ्या पूनमच्या एका नव्या पोस्टनं पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. काल पूनमनं आपण नवीनच सत्य सगळ्यांसमोर आणणार असे म्हटले होते. आता तिची एक पोस्ट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

तुम्ही पाहिलतं मी अजून कोणतंही सत्य समोर आणलंही नाही तोच मला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. स्टेकहोल्डर्सच्या मनात भीती दिसून येत आहे. त्या सगळ्याच परिणाम म्हणून आता माझ्याविरोधात कायदेशीर करायची असं सगळं सुरु झाले आहे. असे पूनमनं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पूनमची काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी समोर आली होती. खरं तर तिच्या पीआर टीमकडूनची त्याबाबत एक पोस्ट शेयर करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर पूनमनं एक व्हिडिओ व्हायरल करुन आपण कुठेही गेलो नसून जिवंत असल्याचे सांगून चाहत्यांना, नेटकऱ्यांना धक्का दिला होता. त्यावरुन तिला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. पूनमनं आपण सर्व्हिकल कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती करत असल्याचे म्हटले होते.

पूनमनं काल देखील इंस्टावरुन आपण आता एक मोठं सत्य समोर आणणार असून त्याचा खुलासा करणार असल्याचे म्हटले होते. तिची ती पोस्ट इंस्टावरुन व्हायरल झाली होती. त्यानंतर आजच्या तिच्या एका पोस्टनं पुन्हा चर्चेला उधाण आली आहे. तिनं आपण अजून सत्य समोर सांगितलेही नाही तोच शेयर बाजारात ज्याप्रमाणे खळबळ उडते तसे झाले आहे. आणि माझ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मला समजले आहे.

बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींनी तिच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यावरुन वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. त्यात कंगना, अनुमप खेर आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी पूनमच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT