Britney Spears file image
मनोरंजन

'माझ्या वडिलांना तुरुंगात टाका' ब्रिटनीचा संताप

ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे.

प्रियांका कुलकर्णी

आपल्या गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यापासून ब्रिटनी आणि वडील जेमी स्पीयर्स यांच्यामध्ये पालकत्वावरून वाद सुरू आहेत. बुधवारी ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात आपली याचिका दाखल केली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य परत हवे असून ती व्यक्तिगत आयुष्यात त्रस्त आहे,असे त्या याचिकेमध्ये ती म्हणाली. बुधवारी व्हिडीओ कॉलद्वारे लॉस ऐंजेलिस कोर्टात ब्रिटनी उपस्थित होता. यावेळी ब्रिटनी म्हणाली, 'मला स्वातंत्र्य परत पाहिजे, मला माझं आयुष्य परत पाहिजे. आता या गोष्टीला १३ वर्षे झाली आणि आता अनेक गोष्टी झाल्या आहेत.या कॉन्जरवेटरशिपमुळे मला फायदा व्हायच्या ऐवजी माझं नुकसान खूप झालं. गेल्या 12 वर्षापासून मी हे भोगते आहे. आता मी रोज भयंकर चिडते. माझा वेळ रडण्यात जातो. मला खरंतर लग्न करायचं आहे. मला आई व्हायचं आहे. पण ही कॉन्जरवेटरशिप मला ते करू देत नाही. गेल्या 12 वर्षात याने मला खूप त्रास झाला आहे. माझे वडील याला कारणीभूत आहेत. माझ्या अत्यंत व्यक्तिगत गोष्टींचे निर्णयही मला घेता आले नाहीत. हा त्रास पाहता मला माझ्या वडिलांना तुरूंगात डांबलं पाहिजे. '(pop star Britney Spears guardianship case she said my father have to go jail)

2008 पासून ब्रिटनीचे वडिल जेमी यांना कॉन्जरवेटर म्हणजेच तिला सांभाळण्याची जबाबदारी कोर्टाने दिली होती. ब्रिटनी ३९ वर्षांची आहे. तिच्या वडिलांचे 2008 पासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पैशांवर आधिकार आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने दिल्या माहितीनुसार 2014 मध्ये ब्रिटनीच्या वडिलांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली. तिच्या वडिलांवर तिने दारूचं व्यसन करत असल्याचा आरोप केला आहे. ब्रिटनीकडे सुमारे 445 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहेत. या आधी ब्रिटनीने गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे पालकत्व हक्क काढून टाकण्यासाठी आणि एका संस्थेला मालमत्ता हक्क देण्यासाठी याचिका दाखल केली होती. 2019 मध्ये ब्रिटनीने आरोप केला होता की तिचे वडील आणि त्यांचे सहकारी तिला सतत धमकावत होते. ब्रिटनी म्हणाली, ‘ते म्हणतात की त्यांना पाहिजे तसं मी करत रहायला हवं, जर मी ते केलं नाही तर ते मला त्याबद्दल शिक्षा देतील. माझे डॉक्टर मला जबरदस्तीने औषधेही देत ​​आहेत. यामुळे मला नेहमीच एखाद्या व्यसनी माणसासारखे वाटते. मला स्वतःला एकट्यात कपडे बदलण्याची आणि गाडी चालवण्याची परवानगी नाही. आता पुरे झाले, मला माझे स्वातंत्र्य परत हवे आहे.'

सोशल मीडियावर ब्रिटनीला तिचे चाहते पाठिंबा देत आहेत. तिच्यासाठी चाहत्यांनी ‘FreeBritney’ नावाचे कॅम्पेनही सुरू केले आहे. तिचे वडील जेमी स्पीयर्स तिच्या पर्सनल लाइफ संबंधित सगळे निर्णय घेतात. ब्रिटनीचे सर्कस, इन द झोन, ब्लॅक आऊट या म्युझिक अल्बमला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT