Post Office Ughad Aahe new marathi serial on sony marathi shivali parab sakal
मनोरंजन

Marathi serial: 'पोस्ट ऑफीस उघडं आहे..' हास्याची मनी ॲार्डर घेऊन येतायत हे कलाकार..

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर सोनी मराठी घेऊन येतेय नवी मालिका..

नीलेश अडसूळ

Post Office Ughad Aahe: सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्राचे भरभरून मनोरंजन केले. भन्नाट विनोदी कलाकारांनी केलेली विनोदाची आतिषबाजी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर असतानाच सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा विनोदी मालिका घेऊन सज्ज झाली आहे.

(Post Office Ughad Aahe new marathi serial on sony marathi shivali parab)

या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' असे या मालिकेचे नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ह्या मालिकेची ही झलक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. सोशल मिडियावरही तिची वाहवा होते आहे.

ज्यांनी पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवला आहे, त्यांच्यासाठी ही झलक स्मरणरंजनवत ठरली आहे आणि ज्यांनी तो काळ अनुभवला नाहीये त्यांच्यासाठीही चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून या मालिकेत एक हलकाफुलका विषय पाहायला मिळेल. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ह्या मालिकेतून पोस्ट ऑफिस हा विषय सोनी मराठी वाहिनी घेऊन येते आहे.

ही हास्याची मनी ऑर्डर घेऊन महाराष्ट्राला हसवायला कोण येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 'हास्यजत्रा'फेम शिवाली परबने हा प्रोमो शेयर केला आहे. त्यामुळे ती युय मालिकेत असणार ही नक्की आहे. शिवाय पंढरीनाथ कांबळे आणि हास्यजत्रेतून बाहेर पडलेला ओंकार भोजने देखील या मालिकेत असणार अशी चर्चा आहे. या शिवाय काही दिग्गज विनोदी कलाकार या मालिकेत दिसणार आहे. लवकरच या मालिकेचा दूसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT