Project K: Esakal
मनोरंजन

Project K: 'सालार'नंतर पुन्हा प्रभास करणार धमाका! पोस्टर शेयर करत निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

Vaishali Patil

साउथ सुपरस्टार प्रभास हा लोकप्रिय कलाकार आहे. त्याच्या चाहत्यांचे फक्त साउथ पुरताच नाही तर जगभरात पसरले आहे. मात्र इतका स्टारडम असला तरी त्याचा फायदा त्याच्या चित्रपटाला होत नसल्याचं दिसत आहे.

त्याचा 'राधे शाम' असो किंवा 'साहो' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यानंतर प्रभास आणि त्याच्या चाहत्यांना 'आदिपुरुष' या चित्रपटापासून खुप अपेक्षा होत्या मात्र त्यादेखील पुर्ण झाल्या नाहीत.

आदिपुरुष चित्रपटामुळे तर बराच वादही झाला. तरी देखील प्रभासचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाचा टिझर रिलिज झाला. सालारचा टिझर रिलिज होताच सोशल मिडियावर प्रभास नावाचं वादळ आलं.

सालारनंतरही प्रभासचे काही चित्रपट रिलिज होण्याच्या तयारीत आहे. असाच एक बहूप्रतिक्षित चित्रपट म्हणजे 'प्रोजेक्ट के'. गेल्या काही दिवासांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

'प्रोजेक्ट के' हा सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. याचित्रपटाची प्रतिक्षा केवळ तेलुगू प्रेक्षकच नव्हे तर प्रभासचे सर्वच भाषिक चाहते करत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी नाग यांनी केले असून या चित्रपटात प्रभाससोबतच दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी आणि कमल हसन यांसारखे सुपरस्टार आहेत.

या चित्रपटाचे फक्त पोस्टर रिलिज झालं असलं तरी त्याचे प्रमोशन मात्र निर्मात्यांनी आत्तपासूनच सुरु केलं आहे. आता मात्र निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सूकता आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा टिझर कधी रिलिज होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता नेहमीच टिकवली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी 'या प्रोजेक्ट के काय?' असं ट्विट केलं होतं.

आता मेकर्सने पुन्हा एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानी लिहिलयं की, "सगळं विश्व शेवटच्या सामन्याची प्रतिक्षा करत आहे. 20 जुलै (यूएसए) आणि 21 जुलै (भारत) प्रोजेक्ट K च्या जगाची झलक पाहण्यासाठी सज्ज व्हा."

प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के'चा टिझर 20 जुलैला अमेरिकेत तर 21 जुलैला भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती या पोस्टरच्या माध्यमातुन देण्यात आली आहे. आता चाहते प्रभास, दिपिका आणि अमिताभ बच्चन यांची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT