Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut  Esakal
मनोरंजन

Prabhas Adipurush: आदिपुरुषचा वाद पेटला, प्रभास सगळं सोडून अमेरिकेत निघाला!

Vaishali Patil

बहू प्रतिक्षितीत चित्रपट आदिपुरुष हा 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, गेल्या कित्येक महिन्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. मात्र सिनेमा रिलिज झाल्यानंतर त्याने प्रेक्षकांना निराश केलं आहे.

ज्या अपेक्षेने प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गेले वास्तवात तस काहीच झालेलं नाही. रामायणातील एक भाग दाखवण्याच्या नादात चित्रपटात डझनभर चुका करण्यात आल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना मुळीच आवडलेल्या नाही. एकीकडे चित्रपटावरुन वाद होत असतांना दुसरीकडे प्रभासच्या चाहत्यांनी या सिनेमाला डोक्यावर घेतल आहे.

सडकून टीका होत असली तरीही सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारल्याच दिसतयं. पहिल्या दिवशी या सिनेमाने १४० कोटींपर्यंत गल्ला जमवला. आता दुसऱ्या दिवशी ही कमाई 65 कोटींवर पोहचली. याचबरोबर चित्रपटाची दोन दिवसांची कमाई 151.75 कोटींवर पोहोचली आहे.

दरम्यान आता आदिपुरुषमधल्या राघव म्हणजेच प्रभासबाबत एक बातमी समोर आली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रभास अमेरिकेला रवाना झाला असल्याच्या बातम्या आहेत. प्रभास एका आठवड्याच्या सुट्टीवर अमेरिकेला गेला आहे. प्रभासचा शेवटचा चित्रपट 'राधे श्याम' रिलीज झाला तेव्हा तो इटलीला गेला होता

प्रभासचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की तो लगेचच भारता बाहेर जातो. असं बोललं जाते. गेल्या अनेक वर्षापासून असंच काहीस चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा आदिपुरुष रिलिज झाल्यानंतर तो अमेरिकेत गेला आहे.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार , प्रभास एका आठवड्याच्या सुट्टीवर आहे आणि तो पुढच्या आठवड्यात भारतात परत येणार आहे. त्यानंतर लगेचच तो त्याच्या पुढच्या सिनेमा 'सालार'चे डबिंग सुरू होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'आदिपुरुष' नंतर तो 'सालार', 'स्पिरिट' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT