prajakta mali marathi actress shared post on social media feeling happy for prajaktara SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: आईशप्पथ, देवाची कृपा..! प्राजक्ता माळीच्या आनंदाला उधाण, म्हणाली.. बरे कर्म केले तर

Devendra Jadhav

Prajakta Mali News: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री. प्राजक्ताला आपण अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन पाहिलंय. प्राजक्ता कधी रानबाजार वेबसिरीजमध्ये बोल्ड भुमिकेत झळकली. तर कधी लकडाऊन सिनेमात सोज्वळ नवरी म्हणुन दिसली.

प्राजक्ता सोशल मिडीयावर नवनवीन पोस्ट करुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच प्राजक्ताने सोशल मिडीयावर एक पोस्ट करुन तिचा आनंद व्यक्त केलाय.

(prajakta mali feeling happy shared post on social media)

प्राजक्ताच्या आनंदाला उधाण, हे आहे कारण

प्राजक्ताने गेल्या दोन वर्षात तिची स्वप्न करत आयुष्याचा यशस्वी टप्पा गाठला आहे. प्राजक्ताने लिहीलेल्या कवितांचा संग्रह म्हणजेच “प्राजक्तप्रभा”. आज प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्ती प्रकाशनाला २ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने प्राजक्ताने सोशल मिडीयावर पोस्ट करुन तिचा अनुभव शेअर केलाय

प्राजक्ता लिहीते.. “प्राजक्तप्रभा” दुसरी आवृत्ती प्रकाशनाला आज २ वर्ष पुर्ण झाली साहित्य परिषद, पुणे आठवणी (१ली आवृत्ती १९ जुलै २०२१...) जुलै २०२१ - जुलै २०२३ ह्या २ वर्षात “प्राजक्तत्रयी” पुर्ण…. हे post लिहीताना जाणवलं. आईशप्पथ  देवाचीकृपा, तुमचा आशिर्वाद, बरीकर्म ह्याची फलश्रृती आणि काय…

प्राजक्ताची करीयरमध्ये यशस्वी मजल

प्राजक्ता तिच्या आयुष्यात अनेक यशस्वी टप्पे ओलांडले आहेत. प्राजक्ताने सुरुवातीला प्राजक्तराज या दागिन्यांच्या ब्रँडचं उद्धाटन केलं. राज ठाकरेंच्या हस्ते प्राजक्तराज चं ओपनिंग करण्यात आलं होतं

पुढे प्राजक्ताने तिच्या कवितेचं पुस्तक प्राजक्तप्रभाचं प्रकाशन केलं. पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद इतका चांगला होता की अल्पावधीत पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.

याशिवाय नुकतंच प्राजक्ताने तिच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. कर्जतला निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने नवीन घर घेतलं असुन घराला प्राजक्तकुंज हे नाव दिलंय. असाप्रकारे प्राजक्तत्रयी तिने पूर्ण केली.

प्राजक्ता माळी श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात

प्राजक्ताने माळीने काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर नवीन फोटो पोस्ट केलाय. यात प्राजक्ता सोबत गुरु दिसत आहेत. आणि प्राजक्ता त्यांच्या चरणांशी बसली आहे. हे फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते..

आर्ट ऑफ लिव्हींगचा अॅडव्हान्स कोर्स पुर्ण केलाय. ३ महिन्यातुन एकदा करावीच लागणारी ही खास गोष्ट. या कोर्समध्ये प्राणायाम, योगा, मेडीटेशन, संगीत, पंचकर्मा, निसर्ग, सात्विक जीवनशैली आणि सात्विक आहार अशा गोष्टी समाविष्ट आहेत. अशी माहिती देत प्राजक्ताने या कोर्सचे तपशील शेअर केलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Nation One Election: ''एवढंच वाटतंय तर चार वर्षांपासून...'', राज ठाकरेंची मोदी सरकारवर पोस्ट

Eknath Shinde: उत्साह, जल्लोष, आनंद... CM एकनाथ शिंदेंनी केलं 'या' स्पेशल व्यक्तीसोबत ढोलवादन; Video Viral

महाराष्ट्रातील राजकारण रंगमंचावर; एकनाथ शिंदे यांच्यावर नाटक येणार; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

IND vs BAN 1st Test Weather Report : भारत-बांगलादेश कसोटीचा पहिला दिवस वाया जाणार? वाचा काय सांगतोय हवमान खात्याचा अंदाज

Amol Mitkari: पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती! मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू ह्दयविकाराने नव्हे तर मारहाणीमुळे

SCROLL FOR NEXT