Prajakta Mali 'Har Ghar Tiranga' Post:भारताचा स्वातंत्र्यदिन(75th Independence Day) हा प्रत्येक भारतीयासाठी एक उत्साहाचा सण असतो. यावर्षी तर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास कारण यंदा आपण आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून 'हर घर तिरंगा' अभियान जाहीर केलं अन् प्रत्येक भारतीय त्यानं झपाटला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी आपल्या घरात,घरावर मानानं तिरंग फडकावला. त्याचसोबत आता 'फोनवर हॅलो नाही,वंदे मातरम म्हणायचं' असं मोदींनी म्हटल्यावर प्रत्येक भारतीय तसं करेल का अशी चर्चा कानावर पडत असताना आता प्राजक्ता माळीची (Prajakta Mali)यासंदर्भातली एक पोस्ट चर्चेत आली आहे.(Prajakta Mali Post On 75th Indpendence Day, 'Har ghar Tiranga')
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती नेहमीच सामाजिक,राजकीय विषयांवर आपलं मत मांडते,ज्याची चर्चा किंवा वादग्रस्त चर्चा होतेच. सध्या प्राजक्ता 'रानबाजार' या वेबसिरीज मधील तिच्या बोल्ड भूमिकेने चर्चेत आहे.तिच्या आतापर्यंतच्या संबंध करिअर मधील ही बोल्ड भूमिका म्हटली जात आहे. पण यातील तिचा अभिनय पाहून वर्षागणिक प्राजक्ताच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावत आहेत हे प्रकर्षानं जाणवतं.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करताना प्राजक्तानं 'हर घर तिरंगा' अभियानाला पाठिंबा देत आपल्या घरावर भारताचा तिरंगा फडकवला आहे. तिनं तो फोटो पोस्ट करत स्वातंत्र्यदिना संबंधित एक सुंदर वाचनीय पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं आपले विचार मांडतानाच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता देखील शेअर केली आहे.
प्राजकतानं आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे,''स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव....स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं!ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं..!आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, #वंदेमातरम् सुरू''
“देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती”…ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना
#माझाप्रियदेश #भारत #ऊरफाटेस्तोवरअभिमान #आदर #अपार #देशप्रेम
#हरघरतिरंगा #अमृतमहोत्सवीभारत
'भारत कोई भूमि का टुकडा नहीं
एक जीताजागता राष्ट्रपुरुष है
यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि हैयह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है
इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है
हम जिएंगे तो भारत के लिए
और मरेंगे तो भारत के लिए...'
- अटलबिहारी वाजपेयी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.