prajakta mali 
मनोरंजन

VIDEO : हम तो उड गए! प्राजक्ता माळीने अनुभवला पॅराग्लायडिंगचा थरार

स्वाती वेमूल

'आजूबाजूचे सगळेच लग्न करतायत, नाहीतर उत्तरेला फिरायला जातायत. म्हटलं आपणही जे सहज शक्य ते करुया', असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. हिमाचल प्रदेशमधील विविध निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत असतानाच प्राजक्ताने तिथे पॅराग्लायडिंगचाही थरार अनुभवला. त्याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

हिमाचल प्रदेशमधील बिलिंग याठिकाणी प्राजक्ताने पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. आयुष्यात पहिल्यांदाच हा अनुभव घेत असल्याचं तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. पॅराग्लायडिंगला सुरुवात करण्यापूर्वी, सुरुवात करताना आणि अनुभव घेतल्यानंतरचे फोटो, व्हिडीओ तिने इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत. 

बिलिंग घाट पाहण्यासाठी आणि पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी इथे जगातून असंख्य पर्यटक येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही जागा प्रसिद्ध आहे. बिरहून धरमशालाला जाताना वाटेत लागणाऱ्या 'महाकाल' देवाचं दर्शनंही तिने घेतलं. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. नवनवीन ठिकाणांना भेट देणे आणि तिथल्या नवीन गोष्टींचा अनुभव घेणे, प्राजक्ताला फार आवडते. तिच्या याच आवडीमुळे तिला 'मस्त महाराष्ट्र' या ट्रॅव्हल शोच्या सूत्रसंचालनाची संधी मिळाली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Most Expensive Player: ऋषभ पंतसह २ अय्यर्सना मिळालेत लिलावात विराटपेक्षा जास्त रक्कम; २० खेळाडूंची किंमत १० कोटींच्या वर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

SCROLL FOR NEXT