Prakash Raj Bollywood Actor Comment On PM Narendra Modi : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अभिनेते प्रकाश राज यांचे नाव घ्यावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सादर करत त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या प्रकाश राज यांची एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
प्रकाश राज यांची वेगळी ओळख म्हणजे ते नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या परिस्थितीवर भाष्य करत असतात. त्यामुळे ते चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे ते देखील ट्रोल झाले होते. आता त्यांनी पुन्हा जे ट्विट केले आहे त्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यात त्यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोबाईलवरील 'व्हिडिओ अॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे
सध्या मोदीजी मेरी माटी, मेरा देश या अभियनात व्यस्त आहेत. त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. प्रकाश राज यांनी त्यावर टीका केली आहे. त्यांचे ते ट्विट व्हायरल झाले आहे. यावेळी त्यांनी मोदींजीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. ते म्हणतात, लाईट, कॅमेरा अॅक्शन....कोण आहेत हे, सगळा नाटकीपणा. त्यांचे हे ट्विट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असून त्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोलही केले आहे.
मोदीजी हे देशभरातील अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. अशावेळी विविध कार्यक्रमांमधून ते जनतेला संबोधित करत असून त्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशावेळी प्रकाश राज यांचे ते ट्विट मात्र लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. प्रकाश राज यांनी खास व्हिडिओ शेयर करुन त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, ते आगामी काळात साऊथच्या काही चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. त्यांनी यापूर्वी बॉलीवूडच्या सिंघम, वॉटेंड, दबंग सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.