Pralhad Keshav Atre aka acharya atre conflict with yashwantrao chavan on sanyukta Maharashtra movement  sakal
मनोरंजन

Maharashtra Din: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फक्त एका 'च' वरुन आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाणांवर तुटून पडले होते..

नीलेश अडसूळ

Maharashtra Din: आज १ मे.. म्हणजे महाराष्ट्र दिन. सर्वत्र जय जय महाराष्ट्र माझा.. असा जयघोष घुमत आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र होऊन मुंबईसह 'संयुक्त महाराष्ट्र' निर्माण झाला. पण हा विजय इतका सहज शक्य नव्हता. या लढ्यात अनेकांच्या प्राणांची बाजी लागली.

जवळपास चार वर्षांहून अधिक काळ तीव्र लढा सुरू होता. या संग्रामात १०६ हुताम्यांचे बलिदान गेले. तर अनेकांचे रक्त सांडून हा महाराष्ट्र घडला आहे. या लढ्यात अनेक कामगार, कलाकार, लेखक, साहित्यिकही सहभागी झाले होते. त्यापैकीच एक म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. म्हणजेच आचार्य अत्रे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे पेटत्या मशाली सारखे धगधगत होते. त्यांची लेखनी आणि हजरजबाबी पणा उभ्या महाराष्ट्राला ठाऊकच होता. त्यांनी आपल्या 'मराठा' वार्तापत्रातून सर्वांवर टीका केलीच. पण वैयक्तिक टीका करणाऱ्यांना, आडवं येणाऱ्यांनाही त्यांनी सोडलं नाही.

यापैकीच एक गाजलेला वाद घडला तो आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये..

(Pralhad Keshav Atre aka acharya atre conflict with yashwantrao chavan on sanyukta Maharashtra movement )

आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं, "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे". अत्र्यांच्या या घोषणेतील 'च' यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं. तर त्यावर हजरजबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले, 'च'ला एवढं महत्त्व कशाला म्हणता? 'च' किती महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या आडनावातला 'च' काढला, तर मागे काय राहतं 'व्हाण'! अशा कडक शब्दात अत्रेंनी यशवंतरावांचा अपमान केला.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्या अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरलं खरं, पण 1962 साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठपणा दिसून येतो.

अत्रेटोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरील त्या भाषणाचा समावेश आहे. त्यात ते म्हणाले होते, "पूर्वीच्या गोष्टी आता उगळीत बसण्याचे कारण नाही व मी त्या उगळीत नाही. आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केलेच नसते.''

''यशवंतरावांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे हे सारेच काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसालासुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो." असे आचार्य अत्रे म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT