Prasad Khandekar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) या दोघांची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये हिट आहे.
प्रसादची बायको अल्पा खांडेकर हीचा आज वाढदिवस आहे. अल्पाच्या वाढदिवसानिमित्ताने प्रसादने बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे. हि पोस्ट जितकी रोमँटिक आहे तितकीच हळवी आहे.
(prasad khandekar emotional and romantic post about his wife birthday)
प्रसादने बायकोसोबतचा खास फोटो पोस्ट करून तिला त्याच्या खास शब्दशैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद लिहितो.. Happy wala birthday dear बायको अल्पा..
अशीच हसत राहा, अशीच ओरडत राहा, अशीच प्रेम करत राहा, आणि सर्वात महत्वाचं, अशीच कायम खुश राहा, मला माहित्येय तुला गिफ्ट म्हणून माझा वेळ हवाय आणि तो मी येत्या वर्षात खुप देईन i promise ..
आणि श्लोक सोबतच तुझा "sweet memories" चा केक बिझिनेस सुद्धा मोठा होतोय हे बघून भारी वाटतय ... I love you darling माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर .... तुला जे जे हवं ते सगळं मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना."
अशी पोस्ट लिहून प्रसादने त्याची बायको अल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अल्पा आणि प्रसाद या दोघांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते.
प्रसाद खांडेकरची पहिलीवहिली हिंदी वेबसिरीज 'मिया बिवी और मर्डर' गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिलीज झाली. याशिवाय प्रसाद खांडेकरने दिग्दर्शक म्हणून त्याच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाची घोषणा केलीय.
एकदा येऊन तर बघा असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाच्या माध्यमातून प्रसाद पहिल्यांदाच लेखक आणि दिग्दर्शक हि दुहेरी भूमिका साकारणार आहे.
प्रसाद सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये अभिनय करत आहे. याशिवाय प्रसाद विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे कलाकारांसोबत कुर्रर्रर्र नाटकात अभिनय करत आहे.
या नाटकाच्या माध्यमातून प्रसादचा अफलातून विनोदी अभिनय प्रेक्षकांना रंगमंचावर लाईव्ह पाहायला मिळतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.