Pratyusha Banerjee Suicide Case Update Esakal
मनोरंजन

Pratyusha Banerjee: 'प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती,त्यादिवशी..', 8 वर्षांनी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा

'बालिका वधू' या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेल्या प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राजवर अनेक आरोप झाले होते.

प्रणाली मोरे

Pratyusha Banerjee: १ एप्रिल २०१६ ला टी.व्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केली अन् अख्खी इंडस्ट्री हादरली होती. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आणि बॉयफ्रेंड राहुल राज सिंग वर अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी आरोप केला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तक्रारही नोंदवली होती. ज्यानंतर काही दिवसांसाठी राहुल राजला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राहुलनं सांगितलं की त्याचा प्रत्युषाच्या केसशी काही संबंध नाही.राहुल म्हणाला,''प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी दोघांनी पार्टी एन्जॉय केली होती''.

यादरम्यान त्याला प्रश्न केला गेला की अखेर दोघांमध्ये असं नेमकं काय झालं होतं की ज्यामुळे प्रत्युषानं इतकं मोठं पाऊल उचललं.

याचं उत्तर देताना राहुल म्हणाला की,''प्रत्युषानं आत्महत्या केली नव्हती''. (Pratyusha Banerjee ex boyfriend Rahul raj claimed that actress did not do suicide know full details)

Pratyusha Banerjee Suicide Case Update

राहुल राजनं दावा करत म्हटलं आहे की,''मला माहितीय तिनं आत्महत्या केली होती. पण खरतंर,त्यादिवशी प्रत्युषा मला घाबरवण्यासाठी फक्त गळफास घेतल्याचा खोटा खोटो व्हिडीओ बनवत होती. ती अनेकदा असं करायची. त्या दरम्यान तिचा पाय सटकला असेल आणि तिला बॅलन्स सांभाळता आला नसेल अन् या कारणानं ती दुःखद घटना घडली असेल''.

काही दिवसांपूर्वीच राहुल राजनं हा खुलासा केला होता की या घटनेनंतर त्याला जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानं सांगितलं की या घटनेनंतर त्याला कोणीच काम देईना.

त्यानं विकास गुप्तावर निशाणा साधत दावा केला की,त्याला 'लॉकअप १' ऑफर झाला होता,पण विकास गुप्तानं त्याचा पत्ता कट केला. विकास गुप्तामुळे माझ्या हातातून शो गेला असं राहुल राज म्हणाला होता.

हाच शो नाही तर अशा कितीतरी शो मधून विकास गुप्तामुळे आपल्याला बाहेर केलं गेलं असा देखील दावा राहुल राजनं केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT