priya bapat umesh kamat marathi natak jar tarchi goshta 1st show gets housefull at thane gadkari rangaytan SAKAL
मनोरंजन

Priya Bapat - Umesh Kamat: प्रिया - उमेशची जादू कायम, नवं नाटक 'जर तरची गोष्ट'चा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल

प्रिया आणि उमेशचं नवीन नाटक जर - तरची गोष्ट रंगभुमीवर दाखल झालंय

Devendra Jadhav

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या नवीन नाटकाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडला. प्रिया आणि उमेश हे मराठी इंडस्ट्रीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. याचा अनुभन नुकताच आला.

१० वर्षानंतर प्रिया आणि उमेश यांचं रंगभुमीवर दमदार कमबॅक झालं. प्रिया - उमेशच्या नाटकाचा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झालाय

(priya bapat umesh kamat marathi natak jar tarchi goshta 1st show gets housefull)

शुभारंभाचा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल

सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते.

हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे. सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.

अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.

शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार

शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.

तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’

१० वर्षानंतर प्रिया - उमेश रंगभुमीवर

प्रिया आणि उमेश दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला.

तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची खूप इच्छा होती. अखेर १० वर्षानंतर रसिकांची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली.

कारण एका दशकानंतर हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकलंय. 'जर तर ची गोष्ट' नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT