Priyanka Chopra Deepfake Video Viral - साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचा तो डीपफेकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आलिया भट्टच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. आता या सगळ्यात बॉलीवूड आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंकाच्या व्हिडिओनं पुन्हा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. Priyanka Chopra Deepfake video viral fans angry
प्रियंकाचा डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून डीपफेकच्या व्हिडिओंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे बॉलीवूड, टॉलीवूड आणि आता हॉलीवूडच्या अभिनेत्रींना त्रस्त केल्याचे दिसून आले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी जेव्हा रश्मिकाचा तो डीपफेक व्हि़डिओ व्हायरल झाला होता तेव्हा त्याविरोधात तातडीनं कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका घेतली होती.
याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डीपफेक व्हिडिओच्या प्रकरणात प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत असे प्रकार होऊ नये म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले होते. या सगळ्यात आता वेगवेगळे सेलिब्रेटी डीपफेकमुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहेत. त्यांना मोठ्या मानहानीला सामोरं जावं लागत आहे.
सेलिब्रेटींचा चेहरा मॉर्फ करुन तो चेहरा अन्य कुठल्या चेहऱ्यावर चिकटवून वेगवेगळे व्हिडिओ शेयर केले जात आहे. यामुळे त्या सेलिब्रेटीचे प्रतिमा हनन करुन त्याला अपमानित करण्याचे काम या डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी कतरिना पासून रश्मिका, काजोल पर्यत अनेक सेलिब्रेटी या डीपफेक व्हिडिओच्या शिकार ठरल्या आहेत.
प्रियंकासोबत घडलं काय?
प्रियंकाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तिच्या चेहऱ्यासोबत तर कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. मात्र तिचा आवाज आणि शब्द यांच्या सोबत छेडछाड झाली आहे. एआयच्या मदतीनं प्रियंकाचा आवाज बदलण्यात आला आहे. डीपफेक व्हिडिओमध्ये प्रियंकाचा आवाज आणि तिनं ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यातून फेक ब्रँड प्रमोशन करण्यात आले आहे.
त्या व्हिडिओमध्ये प्रियंका ही तिच्या एकुण वार्षिक उत्पन्नाविषयी सांगते आहे. मी प्रियंका चोप्रा आहे. मी एक अभिनेत्री, गायक आणि मॉडेल आहे. या वेळी ती व्यक्ती तिनं यंदाच्या वर्षी किती रुपये कमावले हेही सांगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.