तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. भूकंपात आतापर्यंत 36 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपग्रस्तांच्या वेदनांनी संपूर्ण जग दु:खी झाले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. प्रियांकाने आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून दु:ख व्यक्त केले आहे.
प्रियांकाने इंस्टाग्रामवर तुर्की आणि सीरियाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रेस्क्यू टीम एका लहान मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहे. हे दृश्य खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे.
या व्हिडिओसोबत अभिनेत्रीने एक नोटही लिहिली आहे. प्रियांका चोप्राने लिहिले आहे की, 'आठवड्याभरानंतरही त्या वेदना आणि अडथळे सीरिया, (Turkey Earthquake) तुर्कीतील जनतेसमोर उभेच आहेत.'
तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाचा व्हिडिओ शेअर करत प्रियांकाने लिहिले की, "रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे, यामुळे काही आशादायक क्षण आले, जिथे 3 महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, तेथे अनेक लोक अजूनही अडकले आहेत, वाट पाहत आणि जगण्याची आशा बाळगून, त्यांचे कुटुंबीय चमत्कारासाठी प्रार्थना करत आहेत".
"हे हृदयद्रावक आहे. प्रियांकाने लिहिले आहे की, 'निसर्गाचा कोप कोणालाही सोडत नाही, परंतु आपण सर्वजण मदत करू शकतो. तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचे तपशील माझ्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आहेत. मला आशा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे मदत कराल".
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत 36 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती आहे. संपूर्ण जगाने तुर्कस्तान आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.