Ishan Vaidya : जगात भारी ओळख आहे पुणेकरांची. पूणेकरांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट घडली आहे. एक २५ वर्षीय पुणेकर मुलगा थेट आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं प्रतिनिधित्त्व करत त्याच्या शॉर्ट फिल्म निमित्ताने जगभरात स्वतःच आणि भारताचं नाव गाजवत आहे. हा मुलगा आहे ईशान वैद्य. ईशान वैद्य पुण्याचा आहे. तो सध्या इंग्लंड मधल्या सालफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकत आहे.
ईशानची शॉर्टफिल्म 'पफीन आयलंड' हि जगभरातल्या सिनेमा फेस्टिवल मध्ये नावाजली गेली आहे. या शॉर्ट फिल्मची हॉलिवूडमधल्या सोनी फ्युचर फिल्मेकर अवॉर्ड साठी निवड झाली आहे. या अवॉर्ड साठी ईशानच्या पफीन आयलंडला नॉमिनेशन मिळालं आहे. या अवॉर्डचं महत्व अशासाठी आहे कि या पुरस्कार सोहळ्यात १४० देशांमधल्या ३००० फिल्ममेकर्सनी ईशानची शॉर्ट फिल्म नॉमिनेट केली आहे.
नॉन-फिक्शन स्टुडंट फिल्ममेकर अवॉर्डसाठी नामांकित असलेला ईशान वैद्य सोनी पिक्चर्सच्या कल्व्हर सिटी लॉटवर तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये भाग घेणार आहे. या वर्कशॉप मध्ये व्यवसायांसाठी वेगळी दृष्टी देण्यात येईल आणि आणि बुधवारी कॅरी ग्रँट थिएटरमध्ये ब्लॅक-टाय पुरस्कार सोहळा संपन्न होईल. 22 फेब्रुवारीला हा सोहळा पार पडणार आहे.
पफीन आयलंड हि ईशानची शॉर्टफिल्म त्याचा एम. ए फायनल कोर्स साठी केलेला प्रोजेक्ट होता, यूट्यूबवर या शॉर्ट फिल्मला 80,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. पफीन पक्षाचा एक अनोखा प्रवास या शॉर्ट फिल्म मधून उलगडण्यात आलाय. इतक्या मोठ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये सहभागी झाल्याने ईशान खूप आनंदात आहे.
ईशानने त्याच्या भावना सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत,"ही एक अविश्वसनीय संधी आहे आणि मी तिचा पुरेपूर फायदा घेणार आहे. मला इतर अनेक सिनेमा निर्मात्यांना भेटण्याची आणि चित्रपटावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. मी यासाठी खूप उत्साहित आहे. नामांकन मिळणे हे एक मोठे सरप्राईज होते. मला अजूनही या गोष्टीला विश्वास बसत नाहीये"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.