मनोरंजन

आमदाराच्या मुलीला हवी 'थार' गाडी, खासदार सनीचं महिंद्रांना पत्र

आमदाराच्या मुलीला हवी 'थार', खासदार सनी देओलचं थेट महिंद्रा यांना पत्र

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood सनी देओलचा sunny deol एक वेगळा ऑरा आहे. त्याच्या नावाची वेगळी क्रेझ आहे. आपल्या आक्रमक स्वभावानं या अभिनेत्यानं प्रेक्षकांच्या मनात खास जागा तयार केली आहे. त्याच्या चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग आहे. तो अजूनही सनीच्या चित्रपटांसाठी दिवाना आहे. आता सनी चित्रपटांपासून थोडा लांब गेला आहे. आणि राजकारणात सक्रिय झाला आहे. तो भाजपचा खासदार आहे. मात्र राजकारणातही त्यानं आपला वरचष्मा कसा निर्माण होईल याकडे अधिक लक्ष दिलं आहे. सध्या सनी ट्रोल झाला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यानं एका उद्योगपतीकडं केलेली मागणी.

पंजाबातील गुरुदासपूर gurudaspur लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व सनी करतो. आपल्या मतदारसंघातील लोकांना नाराज करायचं नाही. असं धोरण गेल्या काही दिवसांपासून सनीनं ठेवल्याचे दिसून आले आहे. वास्तविक सनीनं राजकारणात प्रवेश केलेल्याला फारसा कालावधी झालेला नाही. तरीही त्याचा मोठा फॅन बेस तयार झाला आहे. जेव्हापासून सनी राजकारणात गेला आहे तेव्हापासून तो चर्चेत आला आहे. याला कारण त्याचा आक्रमक स्वभाव.

सध्या सनीच्या नावाची चर्चा आहे. त्याचं कारण, त्यानं सुजानपूर येथील आमदार दिनेश सिंग बब्बु यांना थार गाडी घेऊन देण्यासाठी थेट महिंद्रा यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामुळे तो ट्रोल झाला आहे. त्या चिठ्ठीमध्ये सनीनं महिंद्रा यांना शक्य तितक्या लवकर थार गाडी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. जेव्हापासून सनी खासदार झाला आहे तेव्हापासून तो त्याच्या मतदारसंघात फार कमी वेळा दिसला आहे. आपल्या मतदारसंघात त्याचं लक्ष नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही त्याला ऐकाव्या लागल्या आहेत.

एका आमदाराला गाडी हवी म्हणून खासदारानं थेट कंपनीच्या मालकाला फोन लावणं ही गोष्ट जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे त्यांनी सनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे सनी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT