R Madhavan on PM Narendra Modi News: अभिनेता आर माधवन पॅरिसमध्ये 14 जुलै 2023 रोजी आयोजित बॅस्टिल डे सोहळ्यात सहभागी झाला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरचा आर माधवन सुद्धा सन्माननीय अतिथी होता.
माधवनने इंस्टाग्रामवर पीएम मोदींसोबत डिनरचा फोटो शेअर केला आणि दोन्ही सरकारांचे कौतुक करणारी एक लांब पोस्ट लिहिली.
(R Madhavan posts pic with PM Modi and French President, pens a heartwarming post)
माधवनला आनंद
माधवन लिहितो, “भारत-फ्रेंच संबंधांसाठी तसेच दोन्ही देशांतील लोकांसाठी चांगले करण्याची तळमळ पॅरिसमध्ये 14 जुलै 2023 रोजी झालेल्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये स्पष्ट आणि तीव्रपशे जाणवली.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन लुव्रे येथे आपले भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी रात्रीचं जेवण आयोजीत केलं होतं. या समारंभात सहभागी होऊन मला आनंद झाला कारण, या दोन नेत्यांनी या दोन महान राष्ट्रांच्या मैत्रीपूर्ण भवितव्यासाठी त्यांचे सुंदर दृष्टीकोन जगासमोर मांडले.
माधवनचा मोदींसोबत सेल्फी
रात्रीच्या जेवणात परस्पर आदर आणि सकारात्मकता असल्याचं माधवनने नमूद केले. याशिवाय दोन्ही देशांच्या दृष्टीकोनाला यश मिळावे यासाठी माधवनने सदिच्छा दिल्यात. माधवन लिहीतो, “राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी उत्सुकतेने आमच्यासोबत सेल्फी घेतला.
यावेळी आमचे माननीय पंतप्रधान अतिशय दयाळूपणे आणि गोडपणे या फोटोत सहभागी झाले.. हा एक क्षण आणि हा फोटो माझ्या मनात कायमचा कोरला जाईल.
संपुर्ण मानवता आणि नम्रतेचा अविश्वसनीय धडा दिल्याबद्दल राष्ट्रपती मॅक्रॉन आणि मोदीजींचे आभार. फ्रान्स आणि भारत एकत्र सदैव समृद्ध होऊ दे." अशी पोस्ट माधवनने लिहीली आहे.
माधवनचा वर्कफ्रंट
माधवनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो काही महिन्यांपुर्वी 'रॉकेट्री' या त्याच्या सिनेमामुळे जोरदार चर्चेत होता. या सिनेमाचं प्रेक्षक आणि समीक्षक दोन्हीकडून कौतुक झालं.
आर.माधवन लवकरच The Railway Men सिनेमात दिसणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.