raees director rahul dholakia wish pakistani artist came india to perform during icc cricket worldcup 2023 SAKAL
मनोरंजन

Rahul Dholakia: पाकिस्तानी कलाकारांना भारतात यायचं आमंत्रण देऊया? रईस फेम दिग्दर्शकाने व्यक्त केली इच्छा

शाहरुखच्या रईस सिनेमाचा दिग्दर्शक राहूल ढोलकियाने पाकिस्तानी कलाकार भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केलीय

Devendra Jadhav

Rahul Dholakia on Pakistani Artist: सध्या भारतात क्रिकेट वर्ल्डकपचं वारं पुन्हा जोर धरु लागलंय. यानिमित्ताने पाकिस्तानी क्रिकेटर पुन्हा भारतात आले आहेत.

अशातच शाहरुखच्या रईस सिनेमाचा दिग्दर्शक राहूल ढोलकियाने पाकिस्तानी अभिनेते आणि गायक पुन्हा भारतात यावेत, अशी इच्छा व्यक्त केलीय.

(raees director rahul dholakia wish pakistani artist came india)

पाकिस्तानी क्रिकेटर भारतात मग पाकिस्तानी कलाकारांना आमंत्रण?

राहुल ढोलकिया यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याद्वारे त्यांनी पाकिस्तानी कलाकारांनीही भारतात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

त्यांनी पोस्ट करुन लिहीलंय की, "आता पाकिस्तानी क्रिकेटर्स अधिकृतपणे येथे आहेत, आम्ही पाकिस्तानी कलाकारांना आमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करू शकतो का? याशिवाय संगीतकारांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करु शकतो?' राहूल ढोलकिया यांनी केलेल्या या पोस्टवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत.

वर्ल्डकप निमित्ताने पाकिस्तानी क्रिकेटर भारतात

'ICC वर्ल्डकप 2023' साठी कडक सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तान क्रिकेट संघ 27 सप्टेंबर रोजी भारतात पोहोचला. हैदराबाद विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 2016 च्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

वर्ल्डकपनिमित्त पाकिस्तानी क्रिकेट संघ सात वर्षांनंतर भारतात आला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर भारतात आल्याचं समजताच राहूल ढोलकियाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात आमंत्रण देण्याची इच्छा व्यक्त केली.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी

२०१६ ला झालेल्या 'उरी' हल्ल्यात एकूण १९ भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर एक मोठा परिणाम म्हणजे पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देणे म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन देशांमधील संबंध सामान्य करणे म्हणून पाहिले जात होते, ज्यावर अनेक भारतीयांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीका केली होती. त्यामुळे गेली अनेक काही वर्ष कोणत्याही भारतीय सिनेमात पाकिस्तानी कलाकार दिसत नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT