आलिया(Alia Bhatt) आणि रणबीर(Ranbir Kapoor) १४ एप्रिल,२०२२ रोजी आपल्या जवळच्या कुटुंबिय,आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. त्यांनी सर्वांसमक्ष एकमेकांना साथ द्यायची वचनं दिली. हा सोहळा पार पडण्याआधी जितकी चर्चा रंगली होती,त्यापेक्षा अधिक चर्चा रंगलीय ती सोहळा पार पडल्यानंतर. कारणही तसंच आहे. आलियाचा भाऊ राहूल भट्ट म्हणाला की,''लग्नात वर-वधूंनी सात फेऱ्यांऐवजी केवळ चार फेरे घेतले आहे''. हे ऐकून मात्र सारेच विचारात पडलेयत. कारण पाहिलं तर परंपरेप्रमाणे लग्नाच्या विधीदरम्यान सात फेरे घेतले जातात,मग आलिया-रणबीरनं चारच फेरे का घेतले असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे.
रणबीर-आलियानं बान्द्र्यातील वास्तु इमारतीत लग्नगाठ बांधली. दोघांचे लग्नविधी दरम्यानचे क्युट फोटो आतापर्यंत साऱ्यांनीच पाहिले असतील. व्हाईट गोल्डन कॉम्बिनेशनच्या पेहरावात रणबीर-आलिया दोघेही स्मार्ट दिसत होते. गळ्यात मोगऱ्याची पुष्पमाळ अन् चेहऱ्यावरचं तेज जणू त्यांच्या उद्याच्या सुखाची साक्ष देत होतं. त्यांनी लग्नानंतर मीडियासमोरही खूप छान पद्धतीन मिस्टर अॅन्ड मिसेस कपूर बनून सर्वांना अभिवादन केलं. हे सगळं चर्चेत आहेच पण तरिही खटकतंय लग्नात सात फेऱ्यांऐवजी चारच फेरे का?
याचं उत्तर देताना राहुल भट्ट म्हणाला,'' हे खूप इंट्रेस्टिंग होतं. आम्ही लग्नात सात फेरे पाहिलेच नाहीत. तिथे स्पेशल पंडित बोलावले होते. मी देखील त्या विधीत सामिल होतो जिथे भावाची आवश्यकता असते. कपूरांच्या घराण्याचे खास पंडित त्यांनी बोलावले होते. ते प्रत्येक फेऱ्याचं महत्त्व सांगताना म्हणाले,'एक फेरा धर्मासाठी,एक फेरा मुलांसाठी'... आणि दुसऱ्या दोन फेऱ्यांविषयी मी बोलू शकत नाही. ते थोडं सीक्रेट आहे. आमचं कुटुंबही अशा अनेक गोष्टींचं पालन करतं ज्या वंशपरंपरागत चालत आलेल्या आहेत. आणि या सगळ्याचं आम्हाला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे कपूरांकडे सात फेऱ्यांऐवजी चार फेरे घेतात हे देखील आमच्यासाठी कुतूहलाचा,उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा भाग ठरलं. मी त्या चारही फेऱ्यांक्षणी तिकडे होतो''.
लग्नानंतर आलियानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो आणि एक मेसेजही शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिनं घरी लग्न का केलं याचं कारण खूप छान समजावून सांगितलं आहे. ती म्हणली,''आमच्या आवडीच्या ठिकाणी,बालकनीजवळ जिथे गेली पाच वर्ष आम्ही एकत्र आमचं नातं अनुभवलं तिथे आमच्या कुटुंबाच्या,मित्रपरिवाराच्या सान्निध्यात आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचं वचन एकमेकांना देणं याशिवाय वेगळा आनंद तो काय....आम्ही कायमचे एकमेकांचे झालो, वुई आर मॅरिड!'' तिनं पुढे पोस्टमध्ये लिहिलंय,''अनेक आठवणी मागे राहिल्यात,आता आम्हाला एकत्र आयुष्य जगत अनेक गोड आठवणी जोडत पुढचं आयुष्य आनंदात जगायचं आहे. जिथे खूप आनंद,हसू,शांतता असेल सोबत खूप सारी धम्माल असेल''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.