Lata Mangeshkar  
मनोरंजन

Rahul Vaidya: खरं सांगू, दीदींच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वीच...

इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेल्या राहुल वैद्यनं (Bigg Boss Fame Rahul Vaidya) गेल्या बिग बॉसच्या सीझनमधून आपली लोकप्रियता टिकवून ठेवली होती.

सकाळ डिजिटल टीम

Indian Idol: इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेल्या राहुल वैद्यनं (Bigg Boss Fame Rahul Vaidya) गेल्या बिग बॉसच्या सीझनमधून आपली लोकप्रियता टिकवून ठेवली होती. सोशल मीडीयावर (Social media News) नेहमीच चर्चेत असणाऱ्या राहुलनं गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passed Away) यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला त्यांच्या अंत्यविधीसाठी जायचे होते. मात्र ज्या कारणास्तव जाता आले नाही त्याचा खुलासा राहुलनं सोशल मीडियावर केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दीदींनी अखेरचा श्वास घेतला होता. त्या 92 वर्षांच्या होत्या. (News of Lata Mangeshkar)

आतापर्यत बॉलीवूडमधून अनेक सेलिब्रेटींनी (bollywood celebrity) दीदींच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी कित्येकांनी त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी भेट दिली होती. काहींना शिवाजी पार्कवर जाऊन दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. यावेळी मराठी कलाकारांना पोलिसांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यापासून मनाई केल्याची खंत अभिनेत्री हेमांगी कवीनं तिच्या पोस्टमधून सांगितले होते. त्यानंतर राहुल वैद्यनं आपल्या प्रतिक्रियेतून दीदींच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राहुलनं म्हटलं आहे की, दीदींच्या पार्थिवावरील तिरंगा जेव्हा हटवण्यात आला तेव्हा त्यांच्याकडे पाहणे मला शक्य नव्हते. माझ्यासाठी तो अवघड प्रसंग होता. माझा गळा दाटून आला होता. खरं सांगू त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी मी तिथून निघालो होतो. कारण मला ते सगळं पाहणं शक्य झालं नसतं. मी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्या जागेवरून निघालो. अशी भावनिक प्रतिक्रिया राहुलनं यावेळी दिली आहे. लता दीदींच्या निधनानंतर भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT