Raj Babbar birthday: raj babbar and smita patil lovestory  sakal
मनोरंजन

...आणि राज बब्बर स्मिता पाटीलच्या प्रेमात! पण समाजाला हे..

आज राज बब्बर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने ही खास आठवण.

नीलेश अडसूळ

Raj babbar birthday : अभिनेत्री स्मिता पाटील (smita patil) यांच्या आठवणी आपण आजही विरसलेलो नाही, त्यांनी चित्रपटात केलेलं काम, त्यांची प्रतिभा, त्यांचे विचार आजही आपल्यामध्ये आहेत. त्या देहाने इथे नसल्या तरी त्यांच्या स्मृती मात्र आपल्यासोबत आहेत. विशेष म्हणजे जेव्हा स्मिता पाटील हे नाव येतं तेव्हा आपसुकच एक नाव जोडलं जातं ते म्हणजे राज बब्बर (raj babbar). दोघांच्या प्रेमाची कहाणी आजही अजरामर आहे. आज राज बब्बर यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया राज आणि स्मिता यांच्या प्रेमाची गोष्ट.. (raj babbar birthday : raj babbar and smita patil lovestory)

बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेते (Raj Babbar) आज सत्तरीत पदार्पण करत आहेत. सध्या ते त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बर (nadira babbar) आणि त्यांच्या दोन मुलांसोबत राहत आहेत शिवाय स्मिता पाटील यांची शेवटची आठवण असलेला प्रतीक बब्बलही त्यांच्या सोबत राहतो. राज यांनी बॉलीवूड तर गाजवलेच शिवाय राजकारणातही ते काही सक्रिय होते. पण एक सल अजूनही त्यांच्या मनात कायम आहे. ती म्हणजे स्मिता यांच्या अकाली जाण्याची. (raj babbar first wife)

स्मिता पाटील यांनी अत्यंत कमी वयात मराठीच नव्हे बॉलिवूड तर बॉलीवूडलाही वेड लावलं होतं. त्यांच्या अभिनयापेक्षा प्रतिभेला लोक नावाजत होते. त्यांची प्रतिभा आणि वैचारिकता इतकी मोठी होती की राज बब्बर विवाहित असतानाही त्यांच्या प्रेमात पडले. कारण स्मिता यांच्याकडे लोक प्रेरणा म्हणून पाहू लागले होते. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची पहिली भेट ‘पलकें’ चित्रपटाच्या वेळी झाली. त्यांच्या या भेटीबद्दल राज सांगतात, 'स्मिता माझ्या आयुष्यात अचानक आली आणि पहिल्याच भेटीत लक्षात आलं की तिच्याकडे कमालीची प्रतिभाशैली आहे. ती खूप खोलवर विचार करणारी आहे. ती प्रत्येकाशी अत्यंत मैत्रीपूर्ण संवाद साधायची. पुढे आमच्यातील जवळीक वाढली.' असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

स्मिताच्या प्रेमात पडण्याआधी त्यांचं लग्न नादिरा यांच्याशी झालं होतं. त्यावर ते सांगतात, 'नादिराशी माझं पटत नव्हतं किंवा आमच्यात काही वाद होते म्हणून मी स्मिताच्या प्रेमात पडलो नाही तर मी खूप आपसूक तिच्या प्रेमात पडलो. नादिरानेही आमचं नातं खूप सामंजस्याने समजून घेतलं. म्हणूनच आम्ही लग्न करू शकलो' असेही ते म्हणाले होते.

नादिरा यांना जेव्हा राज-स्मिताच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. पण केवळ मुलांमुळे (जुही आणि आर्यन) आणि थिएटरमुळे त्या यातून बाहेर येऊ शकल्या. सुरवातीच्या काळात राज आणि स्मिता यांच्या नात्यात बरेच तणाव होते. स्मिताला घर तोडणार, संसार मोडणारी अशा नजरेने पाहिलं गेलं. पण पण हे सर्व समज मोडून या दोघांनी संसार थाटला. राज आणि स्मिता यांना प्रतीक (Prateik Babbar) नावाचा मुलगा आहे. प्रतीकांच्या जन्माच्या वेळी डिलिव्हरी कॉम्प्लिकेशनमुळे स्मिताचा मृत्यू झाला. या धक्क्याने राज पूर्णतः हादरले. यातून त्यांना सावरणे शक्य नव्हते. पुढे त्यांनी पुन्हा पहिल्या पत्नीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि नादिरा यांच्यासोबत संसाराची घडी बसवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT