मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) पतीला म्हणजे राज कुंद्राला (raj kundra) अटक झाल्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावरुन टीका करण्यात आली. वास्तविक त्या प्रकरणात काय दोष आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी तिच्या घरावर देखील पोलिसांनी छापा टाकला. यामुळे उलट सुलट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही सेलिब्रेटींनी शिल्पाच्या समर्थनार्थ काही व्टिट केले आहेत. तिला आपला पाठींबाही दर्शवला आहे. त्यात शक्तिमान फेम मुकेश खन्ना (shaktiman fame mukesh khanna) यांनीही शिल्पाच्या बाजुनं मत व्यक्त केलं आहे. (raj kundra case actor mukesh khan said shilpa should reveal the truth yst88)
टीव्ही मनोरंजन क्षेत्रात मुकेश यांची ओळख शक्तिमान या मालिकेसाठी आहे. त्यांनी त्यात शक्तिमान आणि गंगाधर नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याला लहानांपासून मोठ्या प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला होता. ते त्यांच्या परख़ड प्रतिक्रियेबद्दलही प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या मुकेश खन्ना यांनी आता बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर एक प्रतिक्रिया दिली आहे. जी सध्या चर्चेचा विषय आहे.
मुंबई क्राईम ब्रँचनं राज कुंद्रा आणि त्याच्या इतर 11 साथीदारांना पॉर्न व्हि़डिओ प्रकरणी अटक केली. त्यावरुन सध्या बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. यासगळ्या प्रकरणावर मुकेश शर्मा यांची प्रतिक्रिया अशी आहे की, या प्रकरणात शिल्पाला दोष देणं चूकीचं ठरेल. मात्र त्यात तिच्याकडे काही माहिती असेल तर ती तिनं पोलिसांना द्यावी. जेणेकरुन सत्य काय आहे हे पोलिसांना आणि नागरिकांना कळेल. आतापर्यत इतर कुठल्याही बॉलीवूड कलाकारानं आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुकेश खन्ना यांचे असे म्हणणे आहे की, लोकांना तेवढेच माहिती असते की, जेवढे मीडिया त्यांना सांगते. तेव्हा अशा प्रकरणात जर आपणहून काही माहिती शिल्पानं दिली तर त्यातून सत्य बाहेर येईल असे वाटते. मला राज हा जबाबदार आहे की नाही माहिती नाही, शिल्पा जबाबदार आहे का हेही माहिती नाही. त्याच्या मुळापर्यत जायचेही नाही. जेव्हा सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास सुरु होता. तेव्हा बॉलीवूडमधील एक मोठं स्कँडल समोर आलं होत. अनेक पैलू एखाद्या गोष्टीला असू शकतात. असे मला म्हणायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.