Raj Kundra pornography case Pornography case
मनोरंजन

Raj Kundra pornography case: कास्टिंग डायरेक्टरसह अन्य तिघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

पॉर्नोग्राफी प्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केले असून त्यात बिझनेसमन राज कुंद्राचाही (Raj Kundra) समावेश आहे. वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून एक कास्टिंग डायरेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी एएनआयला सांगितले. गेल्या वर्षी, शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राचे या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव देण्यात आले होते आणि त्याने जवळपास तीन महिने कोठडीत घालवले होते. सप्टेंबरमध्ये तो जामिनावर बाहेर पडला होता. (Raj Kundra pornography case: Casting director and three others arrested by Mumbai Police Crime Branch)

या प्रकरणावरील मौन भंग करताना राज कुंद्रा यांनी एका निवेदनात म्हटले होते की, “खूप विचार केल्यानंतर, अनेक दिशाभूल करणारी आणि बेजबाबदार विधाने आणि लेख फिरत आहेत आणि माझ्या मौनाचा कमजोरपणा असा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही ‘पोर्नोग्राफी’ निर्मिती आणि वितरणात सहभागी झालो नाही हे सांगून सुरुवात करू इच्छितो. हा संपूर्ण एपिसोड काही नसून वेस्ट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मी स्पष्ट करू शकत नाही, परंतु मी खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, जिथे सत्याचा विजय होईल. ट्रोलिंग, नकारात्मकता खूपच कमजोर करणारी आहे. माझे प्राधान्य नेहमीच माझे कुटुंब राहिले आहे, या क्षणी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही.”

Raj Kundra pornography case

राजच्या मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आणि तो प्रौढ चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणात गुंतला होता. लैंगिक व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल बिझनेसमनवर महिलांचे असभ्य प्रतिनिधीत्व प्रतिबंध कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT