Raj Thackeray MNS Chief 100 Marathi Natya Sammelan : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये मराठी कलाकारांना खडेबोल सुनावल्याचे दिसून आले आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आली आहे. या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं कलाकारांनी एकमेकांना आदर देण्याची आणि एकमेकांना कोणत्याही प्रकारे उद्धट पद्धतीनं नावानं हाक न मारण्याची शपथ घ्यावी. असे राज ठाकरे यांनी सांगितले.
चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात उभारलेल्या सूर्यमाला व्यासपीठावर शंभरावं नाट्य संमेलन पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या मुलाखतीनं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या प्रकट मुलाखतीची जोरदार चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी मराठी कलाकार सध्याच्या घडीला कशाप्रकारे वागतात, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचे एकमेकांना बोलणे यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट एकमेकांना मान दिला नाही तर, तुम्ही लोकांसमोर काही नावं ठेवली तर, मराठी चित्रपटांना स्टार्स नाहीत, बाकीच्या भाषेतील चित्रपटांना जसे स्टार्स आहेत तसे आपल्या चित्रपटांना नाहीत. काय ते शॉर्ट फॉर्म नावानं हाका मारतात. तुम्ही तुमचा मान ठेवला नाही तर लोकं का ठेवतील.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, फिल्म मेकिंग हा माझ्या आस्थेचा विषय आहे. चित्रपट माध्यम मला समजतं. मला कॅमेरा समजतो. पण मला नाटकाविषयीचं कुतूहल जास्त आहे. आजपर्यत नाटक मला समजलं नाही. एका चौकोनात सगळा विषय नाटकात कसा आणतात हे मला कळलेलं नाही. आपल्यासमोर हे सगळं जग निर्माण करणं, आणि तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला लावणं हे काही सोपं नाही. ही सगळ्यात मोठी त्या निर्मात्यांची ताकद आहे. म्हणून नाट्यक्षेत्र हे सर्वात कठीण माध्यम आहे.
राज यांनी याप्रसंगी मराठी भाषेविषयीची आस्था आणि मराठी भाषेची सद्यस्थिती यावर परखड शब्दांत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी विसरत चालला आहे. तो मोबाईल टीव्ही मध्ये अडकून पडला आहे. आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत. तुम्ही राज्यकर्ते होता, या देशाचा पंतप्रधान आपल्या मराठा साम्राज्यानं बसवला. आणि आता आपण सगळे एकमेकांमध्ये भांडत बसलो आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.