Raj Thackeray Reaction On Na Dho Mahanor Marathi Poet Passed : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार ना.धो.महानोर यांच्या निधनानं मराठी चित्रपट विश्व मराठी साहित्यसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या शब्दकळेनं मराठी मनाला आनंद देणाऱ्या महानोरांची गीतं ही पुढील कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनात घर करुन राहतील. त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी, याशिवाय राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
जैत रै जैत, अजिंठा, एक होता विदूषक, मुक्ता आणि सर्जा या चित्रपटातून गीतलेखन करत आपल्या प्रतिभेचा अद्भुत अविष्कार महानोर यांनी सादर केला होता. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते साहित्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यरत होते. कधी कवी, लेखक म्हणून तर कधी गीतकार अशा भूमिकांनी चाहत्यांना, वाचकांना त्यांनी निखळ आनंद दिला.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
महानोर यांच्या जाण्यानंतर मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. मराठी चित्रपटविश्वानं मोठा गीतकार गमावला आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मान्यवरांकडून दिल्या जात असताना यासगळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे, वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज यांनी त्या पोस्टमधून महानोर यांच्या प्रती भावना व्यक्त करताना त्यांच्या काही आठवणींना उजाळाही दिला आहे.
राज म्हणतात की, ना.धो. महानोर यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी यांच्या कवितेचा वारसा ना.धों.नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
२०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. अशा शब्दांत राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.