Raj Thackeray reaction on 'Sarsenapati Hambirrao' Marathi Movie. Google
मनोरंजन

'सरसेनापती हंबीरराव' पाहून राज ठाकरे चक्क २ तास...',तरडेंनी सांगितला किस्सा

लेखक,दिग्दर्शक,अभिनेते प्रविण तरडे यांच्या 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाची बॉक्सऑफिसवर चांगली घोडदौड सुरू आहे.

प्रणाली मोरे

लेखक,दिग्दर्शक प्रविण तरडे(Pravi Tarde) जितकं धारदार बोलतो तशीच त्याची लेखणीही चालते. 'मुळशी पॅटर्न','देऊळ बंद','धर्मवीर' आणि आता 'सरसेनापती हंबीरराव' (Sardenapati Hambirrao) या त्याच्या सिनेमांनी हे सिद्ध करुन दाखवल आहे. त्याच्या 'मूळशी पॅटर्न' सिनेमाचा रिमेक करण्याचा मोह तर सलमान खानला देखील आवरला नव्हता. आता प्रविण तरडे पुन्हा चर्चेत आहे एक तर त्याच्या आनंद दिघेंवरील 'धर्मवीर' सिनेमामुळं आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील सुसाट घोडदौडीमुळं.

लेखक,दिग्दर्शक,अभिनेता प्रवीण तारडेचा 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. तडाखेबाज संवाद आणि थ्रीलिंग अॅक्शन सीन्समुळे 'सरसेनापती हंबीरराव' चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन शूर छत्रपतींच्या काळात हंबीरराव मोहिते यांना स्वराज्याचा 'सरसेनापती' होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांची कथा पडद्यावर पहायची म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी अन् मराठी इतिहासाचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक अमराठीसाठी मानाचीच गोष्ट. या सिनेमाचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंसोबत झालेल्या सिनेमाविषयीच्या चर्चेचा त्यांनी उल्लेख केला होता. नेमकं काय म्हणाले होते दिग्दर्शक प्रवीण तरडे.

पत्रकारांसोबत झालेल्या मुलाखती दरम्यान प्रवीण तरडेंना प्रश्न विचारला गेला होता की, 'सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून तुम्ही जेव्हा राजकीय नेते राज ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा नेमकी काय चर्चा तुमच्यात झाली? भारतीय सिनेमावर काही चर्चा झाली का?' यावर उत्तर देताना प्रवीण तरडे म्हणाले,''आम्ही तब्बल दोन तास गप्पा मारल्या. राज साहेब फक्त सिनेमांविषयीच बोलत होते. राजकारणातला 'र' देखील मध्ये डोकावला नाही. मराठी सिनेमाची पुढची वाटचाल,नवीन टेक्नॉलॉजी,VFX, सबटायटल्स,भाषेतले अडथळे यात मराठी सिनेमा कसा टिकणार यावर अधिक प्रगल्भतेने विचार व्हायला हवा'' असं राज ठाकरे म्हणाले.

तसंच,''आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सिनेमांनी स्थान पटकवायला हंव. राज ठाकरे(Raj Thackeray) रोज एक तरी सिनेमा पाहिल्यावरच झोपतात. महाराष्ट्राला मिळालेली ही परंपरा आहे. मग ते शरद पवार साहेब ,बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरे कुणी असो,सारेच सिनेमाचे भक्त म्हणून कलाकारांवरही त्यांचं प्रेम. राज ठाकरे यांच्या बोलण्यात सतत सिनेमातील कॅमेरा अॅंगल,लेन्सेल अॅक्सेस हे विषय जास्त होते. हंबीररावच्या भव्यतेबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी टिझर-ट्रेलरवरही चर्चा केल्याचं प्रवीण तरडे म्हणाले. मराठी सिनेमा या दर्जाचा बनत असेल तर त्याचं भविष्य आणि वाटचाल खूपच चांगली आहे'', असं देखील राज ठाकरेंनी म्हल्याचं तरडेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT