Rajinikanth Defend her Daughter Aishwarya Lal Salaam Movie esakal
मनोरंजन

Rajinikanth daughter Aishwarya: तिनं कधीही 'तो' शब्द वाईट आहे असं म्हटलं नाही, मुलीसाठी रजनीकांत आले धावून! नेमकं घडलं काय?

साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांच्या लाडक्या लेकीची ऐश्वर्या रजनीकांतची एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Rajinikanth Defend her Daughter Aishwarya Lal Salaam Movie : साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांच्या लाडक्या लेकीची ऐश्वर्या रजनीकांतची एक मोठी बातमी समोर आली आहे. तिनं एका कार्यक्रमामध्ये केलेलं ते विधान तिच्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरताना दिसत आहे. त्यावरुन झालेला वाद पाहता अखेर रजनीकांत यांना तिच्यासाठी पुढे यावं लागलं आहे. हे प्रकरण नेमकं होत तरी काय हे आपण जाणून घेणार आहोत.

रजनीकांत यांच्या आगामी लाल सलाम नावाच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचिंग इव्हेंट होता. त्याला ऐश्वर्या उपस्थित होती. यावेळी तिनं तिच्या भाषणामध्ये संघी या शब्दाचा उल्लेख केला. यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तिच्यावर टीका केली. सोशल मीडियावर ऐश्वर्या ही ट्रेडिंगचा विषय होती. त्याचे कारण तिनं उच्चारलेला तो शब्द. यावर तिनं खुलासाही केला होता.

त्या ऑडिओ लाँच सोहळ्यात तिनं म्हटलं होतं की, रजनीकांत हे काही संघी नाहीत. ऐश्वर्याचे ते वक्तव्य वेगळ्या अर्थानं व्हायरल झाले आणि त्यावरुन वाद सुरु झाल्याचे दिसून आले आहे. यात रजनीकांत यांनी ऐश्वर्याच्या बाजूनं प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ऐश्वर्यानं संघी हा शब्द कधीही चूकीच्या अर्थानं उच्चारलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्यावरुन वाद घालणे बंद करा. असे आवाहन रजनीकांत यांनी केले आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

ऐश्वर्या ही साऊथमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माती आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कलाकार आहे. अशावेळी तिचा तो व्हिडिओ अनेक कारणांसाठी चर्चेत आला आहे. त्या वक्तव्याची दखल प्रसारमाध्यमं, सोशल मीडियानं घेतल्याचे दिसून आले आहे.

संघी हा चूकीचा शब्द आहे असे विधान कधीही ऐश्वर्यानं केलेलं नाही. असे रजनीकांत यांनी लेकीविषयी म्हटले आहे. ऐश्वर्यानं तिच्या वडिलांना सोशल मीडियावरुन काही नेटकऱ्यांनी विशिष्ट पक्षाच्या विचारधारेचे असे म्हणून टीका करण्यास सुरुवात केली होती.त्यावर ऐश्वर्यानं त्याबाबत तिचं मत व्यक्त केलं होतं.

माझे बाबा जर अमूक एखाद्या विचारांचे किंवा विचारसरणी फॉलो करणाऱ्यातले असते तर त्यांनी लाल सलाम नावाचा चित्रपट केला नसता. अशा शब्दांत ऐश्वर्यानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लाल सलाम या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्यानं केले असून क्रीडा या विषयावरील हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT