Rajinikanth share post On Working With Amitabh Bachchan After 33 Years  Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan-Rajinikanth: "33 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या गुरुसोबत..." थलायवाचा आनंद गगनात मावेना! पोस्ट व्हायरल

Amitabh Bachchan and Rajinikanth to reunite after 33 years for 'Thalaivar 170': रजनीकांत यांनी याबाबत पोस्ट शेयर केली आहे.

Vaishali Patil

Amitabh Bachchan and Rajinikanth to reunite: मनोरंजन विश्वातील असे सुपरस्टार ज्यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यात पहिलं नाव आहे बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन आणि दुसरं नाव आहे साउथस्टार रजनीकांत.

दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. चाहते त्यांच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत असतात. तब्बल 33 वर्षानंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

थलायवा रजनीकांत आणि अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'थलाईवर 170' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटात दोन्ही कलाकारांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. आता रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

या पोस्टद्वारे सुपरस्टार रजनीकांत यांनी अमिताभ यांच्यासोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला आहे. माझे हृदय आनंदाने नाचत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

फोटो पोस्ट करत रजनीकांत लिहितात की, '33 वर्षांनंतर मी माझे गुरु श्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित लायकाच्या आगामी 'थलाईवर 170' या चित्रपटात पुन्हा काम करत आहे. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे.'

चित्रपटाच्या शूटिंगसाठी रजनीकांत मुंबईत पोहोचले आहेत. अमिताभही त्यांच्यासोबत शुट करणार आहेत.

टीजे ज्ञानवेलचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भुमिका साकारणार आहेत.

अमिताभ आणि रजनीकांत यापूर्वी 1991 मध्ये आलेल्या 'हम' चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय अमिताभ-रजनीकांत यांनी 'गिरफ्तार' चित्रपटातही काम केले आहे. आता या दोन्ही सुपस्टारची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT