Rajnikanth Lavish House : भारतीय सिनेमांचा सुपरस्टार अभिनेता म्हणजे रजनीकांत. रजनीकांतचा जेलर हा नवीन सिनेमा आज रिलीज झालाय. रजनीकांतच्या जेलर सिनेमाची अनेक महिन्यांपासून सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा आज रिलीज झालाय.
त्याचा हा सिनेमा बघितल्यानंतर चाहत्यांमध्ये भलताच जल्लोश बघायला मिळाला. रजनीकांतने बॉलीवूड आणि टॉलीवूडचे अनेक सिनेमे गाजवलेत. या सुपरस्टारच्या आयुष्यात काय चाललंय, तो कुठे राहतो, कशी लाइफस्टाइल जगतो याबाबत जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात. तेव्हा आज आपण रजनीकांतचं आलिशान घर आतून कसं दिसतं ते बघुयात.
रजनीकांत हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. रजनीकांतचा कुठेही परिचय देण्याची कधीच गरज भासत नाही, कारण सिनेमाजगतात त्यांचे नावच एवढे प्रसिद्ध आहे.
अभिनयात येण्यापूर्वी रजनीकांतने कुली आणि बस कंडक्टरच्या नोकऱ्यासुद्धा केल्या. रजनीकांतचा खरा प्रवास सुरु झाला तो जेव्हा एके दिवशी त्याने एका जाहिरातीमध्ये आल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्या एका निर्णयाने त्यांचे आयुष्यच बदलले.
आज रजनीकांतकडे कोटींची संपत्ती आहे आणि तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चेन्नईत पत्नी लतासोबत त्यांचा एक भव्य बंगला आहे.
रजनीकांतचा बंगला जेवढा क्लासिक आहे तितकाच पारंपारिकही आहे. समोरच्या अंगणापासून घराच्या प्रवेशापर्यंत, त्यांंचं संपूर्ण घर कलाकृतीने सजलेले आहे. चला तर मग, रजनीकांतच्या घराची झलक देणारे हे काही फोटो पाहू या. (Lifestyle)
२०२१ च्या रिपोर्टनुसार रजनीकांतच्या या भव्य घराची किंंमत ३५ कोटी असल्याचे सांगितले जाते. रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने आणखी एकदा प्रेक्षकांटी मनं जिंकली आहेत. सिनेमाजगतातलं रजनीकांत यांचं नाव एव्हरग्रीन असल्याचं म्हटलं जातं ते याचं कारणाने. त्याच्या अभिनयाची छाप तो चाहत्यांच्या मनावर कोरून जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.