Raju Shrivastav esakal
मनोरंजन

Youtubeआणि Facebook च्या आधी तो व्हायरल झाला...

आठवणीतील दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव: ज्यांचे किस्सेही हसवून जातात

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्व सुन्न झाले. आपल्या विनोदबुद्धीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राजू यांनी हसू आणलं होतं . राजू तर गेले,मात्र त्यांच्या आठवणी त्यांच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यात नेहमीच असतील.

त्यांची प्रसिद्धि ही घराघरात पोहचलीयं,मात्र ही प्रसिद्धि त्यांना सहसा मिळाली नाही.त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.एका इंटरव्यूत त्यांनी सांगितलं कि 'हंसना मना है' या टी सिरीजची कॅसेट प्रसिद्ध झाली. जी खूप हिट झाली. लोक ती रिक्षात खूप आवडीने ऐकत असतं. राजू स्वत: त्याचा आनंद घेत आणि मुद्दाम त्यांना म्हणत,"हे काय ऐकत आहे,बंद करा ,काहितरी चांगल लावा. यावर रिक्षावाला म्हणायंचा की,नाहि ओ दादा ,कुणी तरी श्रीवास्तव आहे.खूप हसवतो."

जेव्हा त्यांना राजू श्रीवास्तव सारखी कॉमेडी करण्याचा सल्ला मिळाला त्याचाही किस्सा त्यांनी सांगितलायं . ट्रेनमध्ये ते 'शोले'ची स्टोरी प्रवाशांना त्यांच्या मनोहर या पात्राच्या स्टाईलमध्ये सांगत होते, तेव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या काकांनी ते ऐकले आणि म्हणाले, "तु जे हे करत आहात ते वेगळ्या पद्धतीने कर. यात अजून थोडी मेहनत करं.त्याची कॅसेट बनव बॉम्बेमध्ये तुझीही कॅसेट येईल ... श्रीवास्तवची एक कॅसेट आहे त्याच्याकडून आइडिया घे ना."

त्या ट्रेन मध्ये बसलेल्या काकांना याची कल्पना ही नव्हती की ज्या व्यक्तीचे नाव ते त्यांना सांगत होते तेच त्यांच्या समोर होते. कारण लोकांनी फक्त त्यांचा आवाज ऐकला होता त्यांना प्रत्यक्षात पहिलच नव्हत.याचा अर्थ असाच 'हंसना मना है' च्या माध्यमातून त्यांना लोक आवाजाद्वारे ओळखत होते अन् आता त्यांना सर्वच विसरूच शकत नाही .ते एक महान हस्ती बनले आहे आणि नेहमीच आपल्या आठवणीत राहतील .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT