Raju Srivastav Health Update: प्रसिद्ध कॉमेडियन राजु श्रीवास्तवची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपासून राजु हा एम्स रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर सातत्यानं डॉक्टरांकडून उपचार सुरु (Tv Entertainment News) आहेत. यासगळ्यात त्याच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याचा एमआरआय रिपोर्ट.. (Vial News) त्यातून समोर आलेल्या माहितीनं राजुच्या फॅन्सची चिंता थोडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र डॉक्टरांनी कोणताही काळजी करण्याचे कारण (Social Media Viral News) नसून तो येत्या काही दिवसांत बरा होईल. असा अंदाज वर्तवला आहे.Raju Srivastav Health Update viral
दरम्यान राजुच्या भावानं दीपू श्रीवास्तवनं त्याच्या प्रकृतीविषयी काही अपडेट दिले होते. काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राजुचे एमआरआय केले. त्यातून त्यांना काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्या राजुच्या मेंदूच्याबाबत आहे. राजुचे सर्व नातेवाईक हे आता दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. देशभरातील राजुच्या चाहत्यांनी तो बरा व्हावा यासाठी देवाचा धावा सुरु केला आहे. राजु हा टीव्ही मनोरंजन विश्वातील मोठा सेलिब्रेटी आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.
द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंजमधून राजु हा सर्वांच्या नजरेत आला होता. यावेळी त्यानं सादर केलेल्या एकपात्री प्रयोगांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. या शो मुळे राजुचं नशीब बदलून गेलं. त्यानंतर तो काही मालिकांमध्ये दिसला. जाहिरातींमधून त्यानं काम करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये अँकरिंग करण्यासाठी राजुला बोलावले जायचे. त्याच्या आजारपणाचे वृत्त कळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील राजुप्रती काळजी व्यक्त केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा डॉक्टरांनी राजुच्या मेंदूचे एमआरआय केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, त्याच्या मेंदूतील एक नस दबली गेली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास थोडासा वेळ जात आहे. त्यामुळे तो आजार रिकव्हर होण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. पुढील दहा दिवसांच्या आत तो पूर्वपदावर येईल असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांना आशा आहे की, तो पुन्हा बरा होईल. राजुच्या फॅन्सनं तो बरा व्हावा म्हणून देवाचा धावा सुरु केला आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेरनं तर राजुसाठी महामृत्युंजयचा जप करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.