Raju Srivastava Health Update esakal
मनोरंजन

Raju Srivastava Health Update: 'आता फक्त...' जीवलग मित्र एहसान भावूक

प्रसिद्ध कॉमेडियन राजु श्रीवास्तवच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Raju Srivastava: प्रसिद्ध कॉमेडियन राजु श्रीवास्तवच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत (viral news) असलेल्या राजुविषयी डॉक्टरांची देखील प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्या मेंदूतील नस दबली (social media news viral) गेल्यानं त्याचा मोठा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर झाल्याचे त्यांनी सांगितले होते. ट्रेड मिलवर धावताना राजुला अचानक चक्कर (entertainment news) आली होती. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी राजुच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती.

काही वेळापूर्वी राजुच्या पत्नीनं चाहत्यांना आवाहन केले होते की, कृपया कुणी चुकीच्या बातम्या पसरवू नये. आम्ही सर्वजण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. यासगळ्यात राजुचा परममित्र एहसान कुरेशीची प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडियन लाफ्टर चँलेजपासून या दोघांची मैत्री आहे. त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजनही केले होते. राजुची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी काळजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी देखील राजुसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्याच्या कुटूंबियांना केले आहे. प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनं देखील राजुसाठी प्रार्थना केली आहे.

10 ऑगस्ट रोजी राजुला एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो बेशुद्धावस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. एहसाननं दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यानं आता फक्त एखादा चमत्कारच राजुला या मृत्युच्या दाढेतून बाहेर काढू शकतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजुचे चाहते आणखी काळजीत पडले आहे. डॉक्टरांनी देखील राजुची आशा सोडून दिली आहे. त्यांनी आम्ही राजुला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत. असे कुटूंबियांना सांगितल्याचे एहसाननं प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

आम्ही सगळे मित्र राजुसाठी प्रार्थना करत आहोत. तो बरा होईल अशी आशा आम्हाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजु मृत्युशी झुंज देतो आहे. या संकटातून तो बाहेर येईल असेही एहसाननं एका पोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT