Rakhi Sawant- Adil Khan Durrani Case update Google
मनोरंजन

Rakhi Sawant Case Update:'आदिलनं माझे न्यूड व्हिडीओ बनवून..', 7 महिन्यात काय काय घडलं..राखीचा शॉकिंग खुलासा

राखीनं तनु चंदेलसोबत आदिलचं लग्न आणि तिचे न्यूड व्हिडीओ बनवून विकण्याच्या त्याच्या प्लॅनविषयी मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Rakhi Sawant Case Update: राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यातील वादाच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता तर राखीनं अंगाचा थरकाप उडवणारा खुलासा मीडिया समोर केला आहे. आदिल आपले न्यूड व्हिडीओ बनवून विकायचा असा खळबळजनक खुलासा राखीनं केला आहे.

राखीनं तनु चंदेलसोबत आदिलचं लग्न आणि तिचे न्यूड व्हिडीओ बनवून विकण्याच्या त्याच्या प्लॅनविषयी मोठा खुलासा केला आहे. ती म्हणालीय,''आदिलने माझे न्यूड व्हिडीओ शूट केले आहेत आणि लोकांना ते विकले आहेत. माझी केस सायबर क्राइमची आहे. आता त्याला तनुसोबत तिसऱ्यांदा लग्न करायचे आहे''.

कोर्टात पोहोचण्या दरम्यान राखीनं मीडियासोबत काही गोष्टी शेअर केल्या. ती म्हणाली, ''मी माझी बाजू कोर्टासमोर मांडण्यासाठी आली आहे. आदिलला जामीन मिळायला नको. मी माझं मेडिकल चेकअप केलं आहे आणि माझ्याकडे असलेले आदिल विरोधातले पुरावे ओशिवरा पोलिस स्टेशनला सोपवले आहेत''.

''मी इथे कोर्टात आता न्यायाधीशांकडे न्याय मागायला आली आहे. आदिलनं माझा खूप छळ केला आहे आणि माझ्यासोबत धोका केला आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळू नये यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. मी माझे बॅंक स्टेटमेंट्स देखील पोलिसांना दिले आहेत''.

''त्यानं माझ्याकडून जबरदस्तीनं बॅंकेचा ओटीपी नंबर घेतला आणि माझे सगळे पैसे चोरले..त्यानं माझा विश्वासघात केला आहे''.(Rakhi Sawant- Adil Khan Durrani Case update rakhi allegation he sold my nude video tortured me for 7 months)

राखीच्या वकीलांच्या टीमनं देखील सुरु असलेल्या कार्यवाही संदर्भात मीडियासोबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आदिल विरोधात जे पुरावे कोर्टात दाखल केले आहेत ते पुरेसे आहेत त्याला जामीन मिळू नये यासाठी.

४९८ आणि ३७७ कलमच नाहीत तर आणखी कितीतरी गंभीर कलमां अंतर्गत राखी आदिलवर आरोप लावू शकते. १.५ करोड रुपयांची फसवणूक हा एक गंभीर आरोप आहे आणि या विषयावर कोर्टातही चर्चा होऊ शकते. यावर सुनावणी झाल्या नंतर आदिलला काय शिक्षा दिली जावी यावर विचार केला जाईल.

वकील पुढे म्हणाले, ''पोलिसांनी सुरुवातीला सर्व गोष्टी समोर आणल्या नाहीत म्हणून आदिलला न्यायालयीन कोठडीत ठेवलं गेलं. राखीनं त्याला पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो''.

''आरोपीचे वकील कोर्टासमोर हजर नव्हते. त्यामुळे जामीनासाठी केल्या जाणाऱ्या अर्जाविषयी आता सोमवारी विचार केला जाऊ शकतो. आदिलला पोलिस कोठडी मिळावी याचं आम्ही समर्थन करतो..आणि आमचे प्रयत्न त्यासाठी सुरू आहेत''.

'' राखीच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा आहे तसंच तिच्या कडे यासंदर्भातील पुरावे आहेत..आणि राखी आम्हाला पूर्ण या केसमध्ये सहाय्य करत आहे. त्यामुळे आम्ही सगळे पुरावे घेऊन लवकरच कोर्टासमोर आमची बाजू आणखी भक्कम करू''.

राखीनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शेअर केलं होतं की,तुन चंदेल सोबत आदिलचं रिलेशन आहे याबाबतीत तिला ठाम माहितीय. आदिलनं तनुला सांगितलं आहे की,जेलमधून बाहेर आल्यावर तो एक पत्रकार परिषद घेणार आणि पाच दिवसांत तिच्याशी लग्न करणार.

आणि याविषयी तुझ्याकडे काय पुरावे आहेत असं राखीला विचारल्यावर तिनं पलटवार करत म्हटलं,''माझ्याकडे पुरावे आहेत आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा मी त्यांचा खुलासा करणार''.

कोर्टातून बाहेर आल्यावर राखी म्हणाली,''आदिलनं माझा शारिरीक छळ खूप वाईट पद्धतीनं केला आहे. मी ७ महिने खूप सहन केलं आहे. राखी सावंत हे एक नाव आहे,त्याला वलय आहे त्यामुळे मी याविषयी काहीच बोलू शकले नव्हते..पण आदिलनं सगळ्या मर्यादा ओलांडल्या तेव्हा सगळं बोलणं मला भाग पडलं''.

गेले ७ महिने माझा जो शारिरीक छळ झाला त्यासाठी मला न्याय मिळावा म्हणून मदत करा असं भावूक आवाहनही राखीनं मीडियाला केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT