rakhi sawant shared her emotion with contestant about no one family member to come and meet her in bigg boss sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आजवर राखीच्या घरचे कधीही तिला.. हसवणाऱ्या राखीनं आज रडवलं..

बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या राखीने आज वैयक्तिक आयुष्याला एक भावनिक किस्सा सांगितला.

नीलेश अडसूळ

rakhi sawant: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. राखीने या आधी बिग बॉसचे बरेच सीजन केले आहेत. त्यामुळे तिला या खेळतला चांगलाच अनुभव आहे. बिग बॉसच्या घरात शेवटच्या काही दिवसांमध्ये स्पर्धकांच्या घरचे त्यांना भेटायला येतात, याच बाबत राखीने एक भावनिक आठवण सांगितली आहे.

(rakhi sawant shared her emotion with contestant about no one family member to come and meet her in bigg boss)

बिग बॉस च्या घरातील एक सर्वात हळवा प्रसंग म्हणजे जेव्हा स्पर्धकांना त्यांचे घरचे भेटायला येतात. दरवर्षी बिग बॉस च्या खेळात हा शिरस्ता कायम असतो ज्याची घरचे स्पर्धक आणि प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असतात. 80 दिवस घरच्यांच्या संपर्काशिवाय राहणाऱ्या या स्पर्धकांना शेवटच्या काही आठवड्यात काही क्षणासाठी आपल्या घरच्यांना भेटायची संधी मिळते. यावेळी स्पर्धक धायमोकळून रडतात. सध्या हाच अनुभव आपल्याला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आहे.

कालच्या भागात आपण पाहिले की अमृता धोंगडेचे आई-बाबा तिला भेटायला आले होते. तिने अभिनय क्षेत्र निवडल्याने तिचे घरच्यांशी वाद होते पण तिचा खेळ पाहून ते तिला भेटायला आले, या भावनिक प्रसंग प्रेक्षकांनाही रडवून गेला. आजच्या भागात किरण माने, आरोह वेलणकर, अपूर्वा यांच्याही घरचे भेटायला येणार आहेत. पण याच वेळी राखीने एक गोष्ट सांगितली त्यावरून घरचे सगळेच भावनिक झाले.

स्पर्धकांशी बोलताना राखी म्हणाली, 'मी इतके सीजन केले बिग बॉसचे.. पण आजवर कधीही कुणीही माझ्या घरून मला भेटायला आले नाही..' त्यावर तिला असं का? ही विचारण्यात येतं.. तेव्हा टी म्हणते, 'आई आजारी असते, त्यामुळे ती येऊ शकत नाही.. ती टीव्ही वरूनच मला भेटते. इथे सगळ्यांचे नातेवाईक येतात त्यांना भेटतात, पण मी एकटीच असते.. पण अशावेळी मी खूप खंबीर राहते..' तिचे हे शब्द ऐकून सगळ्यांचेच डोळे भरून येतात. आणि या पर्वात तुझ्यासाठी नक्कीच कुणीतरी येईल अशी आशा व्यक्त करत तिचे सांत्वन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT