Rakhi Sawant Viral Video Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Video: राखीला आवडला विषय संपला! त्याच्यावर केला पैशांचा वर्षाव!

Vaishali Patil

Rakhi Sawant VIral Video: सध्या मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत की जे चित्रपट आणि व्यावसायिक कामामुळे कमी तर त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत असतात. या कलाकारांचे चित्र विचित्र व्हिडिओ पापाराझी शुट करतात आणि ते व्हायरल करतात. यात उर्फी जावेद असो, शर्लिन चोप्रा असो किंवा ड्रामा क्विन राखी सांवत.

त्यातच राखी सावंत हे असं नाव आहे जे काही न करताही चर्चेत असतं. तिला रोज काहीतरी नवा ड्रामा करायचा असतो.

ती तिच्या फनी स्टाइल कधी कधी लोकांना हसवते तर कधी कधी तिचे व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हात लावतात. यावेळीही असचं काहीसं घडलं.

मंगळवारी सकाळी राखीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राखी सावंत एका व्यक्तीवर पैशांचा वर्षाव करतांना दिसली.

हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओत ती विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये दिसत आहे.

तिथे ती एका व्यक्तीला पाहते आणि लगेचच तिच्या कारकडे जाते आणि तिच्या पर्समधून पैसे काढते आणि त्याच्यावर नोटांचा वर्षाव सुरू करते.

हे पाहताच आजूबाजूचे लोक हैराण झाले आहेत. तर काहींनी जमिनीवर पडलेल्या नोटा गोळा करायलाही सुरुवात केली.

आता राखीचा व्हिडिओ म्हटल्यावर नेटकरी कुठे गप्प बसणार त्यानीही पोस्टवर कमेंट करत नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं आहे. एकाने तर तिला कायद्याचं ज्ञान दिलं आहे.

तो कमेंटमध्ये लिहिलं आहे की, 'हे RBI च्या नियमांच्या विरोधात आहे, बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 च्या कलम 35A नुसार तुम्ही हे करू शकत नाही.'

तर एकानं लिहिलं की, काही दिवसांपुर्वी ही तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे मागत होती. काहींनी तिचा पती आदिलच्या नावानेही तिला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT