गेल्या वर्षी रक्षाबंधन उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत Akshay Kumar एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचं नाव 'रक्षाबंधन' Raksha Bandhan असं असून आजपासून (२१ जून) त्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयने सेटवरील एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे हा चित्रपट बहीण अल्काला समर्पित केल्याचंही त्याने म्हटलंय. (Raksha Bandhan shoot begins Akshay Kumar dedicates it to his sister Alka)
'मी लहानाचा मोठा होत असताना माझी बहीण अल्का माझी पहिली मैत्रीण होती. आमची मैत्री अत्यंत सहज होती. आनंद एल. राय यांचा 'रक्षाबंधन' हा चित्रपट तिला आणि त्या खास नात्याला समर्पित आहे. आज शूटिंगचा पहिला दिवस आहे, तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची खूप गरज आहे', असं कॅप्शन अक्षयने या फोटोला दिलं आहे. या चित्रपटाचं लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक हिमांशु शर्मा यांनी केलं आहे, ज्यांनी 'झिरो', 'तनु वेड्स मनु' फ्रेंचायझी आणि 'रांझना' सारखे चित्रपट देखील लिहिले आहेत. यामध्ये अक्षयसोबत पुन्हा एकदा अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिका साकारणार आहे. भूमी आणि अक्षयने 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं.
या चित्रपटाच्या नावावरून असे दिसून येते की, हा कौटुंबिक चित्रपट असेल. याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरमधून भावा-बहिणीचे प्रेम दाखवले होते. याबाबत निर्माते आनंद एल. राय यांनी म्हटले आहे की, "अक्षय खूप प्रतिभावान अभिनेता आहे आणि मी पुन्हा एकदा 'रक्षाबंधन'साठी त्याच्याबरोबर काम करण्यास अधिक उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा खूप खास आहे. यात एक सुंदर प्रकारे फुलणारे भावा- बहिणीचे नाते दाखवले आहे. जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी तुमच्या मनाला इतके खोलवर आणि सहज स्पर्श करते. ही कहाणी तुम्हाला हसवेलही आणि रडवेलही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.