Rakul Preet Singh Wedding Date Jackky Bhagnani esakal
मनोरंजन

Rakul Preet Singh Wedding : अखेर रकूलच्या लग्नाची तारीख ठरली, 'जॅकी' सोबत कधी घेणार सात फेरे माहितीये?

युगंधर ताजणे

Rakul Preet Singh Wedding Date Jackky Bhagnani :

बॉलीवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग ही नेहमीच तिच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या चित्रपटांना आणि अभिनयाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. रकूल ही सध्या नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं परदेशी गेल्याचे सांगण्यात येत आहे.अशातच तिच्या बाबत एक गोड बातमी समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून रकूलच्या रिलेशनशिपविषयी सोशल मीडियावर गॉसिपिंग सुरु होतं. रकूल ही बऱ्याच दिवसांपासून तिचा मित्र जॅकी भगनानी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता तिच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. यापूर्वी देखील लग्नाबाबत बातम्या व्हायरल झाल्या होत्या. सध्या तिनं विदेशात गेल्यानंतर न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटोही व्हायरल केले आहेत. (Gossip about relationships on social media)

रकूलच्या त्या मोनोबिकीनी फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यात काहींनी यंदाच्या वर्षी तरी तुझी गोड बातमी आम्हाला मिळणार आहे की नाही असा प्रश्नही तिला विचारला आहे. लेटेस्ट मीडिया रिपोर्टस नुसार येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये रकूल आणि जॅकी हे विवाहबद्ध होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. त्यात या दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की, हे दोन्ही सेलिब्रेटी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न करणार आहेत. ते डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती आहे. ती गोव्यामध्ये विवाहबद्ध होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या ती जॅकीसोबत थायलंडमध्ये व्हॅकेशन इंजॉय करत आहे. तिथेच ती जॅकीचा बर्थ डे सेलिब्रेशनही करणार आहे असेही बोलले जात आहे.

२०२१ मध्ये रकूलनं जॅकीसोबतच्या रिलेशनशिपवर खुलासा केला होता. त्यावेळी तिनं त्याच्यासोबत फोटो शेयर करुन त्याला एक रोमँटिक कॅप्शनही दिली होती. त्यानंतर तिच्या रिलेशनची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT