Ram Charan esakal
मनोरंजन

Ram Charan: राम चरणवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पण का? पाहा व्हिडीओ

priyanka kulkarni

Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी राम चरणची पत्नी उपासनानं (Upasana) मुलीला जन्म दिला. राम चरण आणि उपासना यांना अनेकवेळ एकत्र स्पॉट केलं जातं. आता उपासना आणि राम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेकजण राम चरणचं कौतुक करत आहेत.

राम चरण आणि उपासनाचा व्हिडीओ व्हायरल

राम चरण आणि उपासना हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी फ्लाइटमधून जामनगरला जात होते. फ्लाइटमधील राम चरण आणि उपासना यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राम चरण हा पत्नी उपासनाच्या पायाची मालिश करत आहे.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

राम चरण आणि उपासना यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "कपल गोल्स" तर दुसऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, "नवरा असावा तर असा"

राम चरण आणि उपासना हे बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2012 मध्ये राम चरण आणि उपासना यांनी लग्नगाठ बांधली.2023 मध्ये उपासनानं मुलीला जन्म दिला. राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या मुलीचं नाव क्लिन कारा असं ठेवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT