Ram Charan at G - 20, ram charan, rrr, ram charan g 20 dance SAKAL
मनोरंजन

Ram Charan at G - 20: राम चरणने साऊथ कोरियाच्या अँबेसेडर सोबत केला Natu Natu डान्स, व्हिडिओ व्हायरल

भारतात सध्या जी-२० परिषदेची चर्चा आहे

Devendra Jadhav

Ram Charan at G - 20 Natu Natu News: भारतात सध्या जी-२० परिषदेची चर्चा आहे. या परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासोबतच, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवणारा लाईट अँड साऊंड शो देखील आयोजित करण्यात आला होता. याशिवाय दिल्लीत होत असणार्या या परिषदेत अभिनेता राम चरण सहभागी झालाय.

(Ram Charan Performs rrr Natu Natu Dance with South Korean Ambassador, Video Goes Viral)

राम चरणचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. G २० समेटमध्ये राम चरण दक्षिण कोरियाच्या राजदूतांसोबत RRR सिनेमातील त्याच्या लोकप्रिय आणि ऑस्कर विजेत्या नाटू-नाटू गाण्यावर नाचताना दिसला.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो कोरियाच्या राजदूताला नाटू-नाटूची हुक स्टेप शिकवताना दिसत आहे. राम चरणच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

मंचावर बोलताना राम चरणने काश्मीर बद्दल कौतुक केलं. तो म्हणाला की, काश्मीर हे असे ठिकाण आहे जिथे तो 1986 पासून येत आहेत.

त्याच्या वडिलांनी काश्मीरमधील गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये खूप शूटिंग केले आहे. 2016 मध्ये काश्मीर मधील ऑडिटोरियममध्ये शूटिंग केल्याचे त्याने सांगितले.

राम चरण पुढे म्हणाला की, काश्मीरमध्ये नक्कीच काहीतरी जादू आहे. काश्मीरमध्ये असे काही आहे जे आल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशाप्रकारे राम चरणने काश्मीरचं कौतुक केलं.

G २० परिषदेत सहभागी होण्यापूर्वी साऊथचा अभिनेता राम चरण त्याची पत्नी उपासना कामिनेनीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे.

त्याने सोमवारी सुट्टीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही मालदीवमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

राम चरण आणि उपासना दोघेही आई बाबा होणार आहेत. यापूर्वी दुबईमध्ये या दोघांनी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT