Neighbours complain that media invasion has been dangerous Google
मनोरंजन

रणबीरच्या शेजाऱ्यांची पोलिसांत तक्रार; म्हणाले, 'लग्न ह्याचं,त्रास आम्हाला'

पाली हिल रेसिडन्ट्स असोसिएशनच्या सेक्रेटरींनी नेमकी ही तक्रार कोणाविरोधात आणि का केलीय याचं स्पष्टिकरण एका निवेदनातून दिलं आहे.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kpoor) आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या लग्नाची बातमी एव्हाना चहूबाजूला पसरलीय. अन् निमंत्रितांसोबत बिन बुलाए मेहमानही बान्द्र्यात रणबीरच्या वास्तु इमारतीजवळ येऊन उभे ठाकलेयत. प्रत्येकाला अनुभवायचंय रणबीर-आलियाच्या लग्नाचा तामझाम. त्यामुळं 'वास्तु' जवळ तोबा गर्दी झालेली पहायला मिळतेय. त्यात मीडिया तर लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा फोटो मिळवण्यासाठी जीवाच्या आकांताने आरडाओरड करत धडपडताना दिसतेय. येणाऱ्या गाड्यांच्या मागे धावत फोटो-व्हिडीओ कॅप्चर करायचा प्रयत्न करताना दिसतेय. रणबीर राहत असलेल्या बान्द्र्यातील पाली हिलवरील 'वास्तु' इमारत किंवा तिचा आजुबाजूचा परिसर हा बहुतांशी उच्चभ्रू लोकांचा भाग. त्यामुळे तिथे अर्थातच लग्नाला येणाऱ्याच नाही तर राहणाऱ्या रहिवाशांच्याही बड्या-बड्या गाड्या. पण इमारतीजवळील गेल्या चार-पाच दिवसांत मीडियाच्या सुरू असेलल्या गोंधळामुळे आणि फोटोसाठी केल्या जाणाऱ्या गडबडीला कंटाळून पाली हिल रेसिडन्ट्स असोसिएशनकडे 'वास्तु'च्या रहिवाशांनी अखेर तक्रार नोंदवली अन् मग असोसिएशननं यातनं मार्ग काढण्यासाठी थेट पोलिसांची मदत घेतली.

ही तक्रार रहिवाशांनी मीडियाविरोधात केली आहे. लग्नाला येणाऱ्या गेस्टचे फोटो काढण्यासाठी मीडिया गाडीमागे धावतं,कधी पहातही नाहीत की गाडीत गेस्ट आहेत की तिथे राहणारे रहिवाशी आणि फोटो काढू लागतात,अशावेळेस गाडीच्या चाकाखाली येऊन अपघात झाला तर भुर्दंड आम्हाला लागेल असं तक्रारीत म्हटलं गेलं आहे. मीडिया ज्या पद्धतीनं येणाऱ्या गाडीवर हल्लाबोल करते त्याची भीती वाटते असं देखील तक्रारीत म्हटलं गेलं आहे.

'फेरा' च्या सेक्रेटरींनी तक्रार ऐकून घेतल्यावर प्रथम त्याची शहानिशा केली. आणि नंतर यावर तोडगा काढण्यासाठी दुसरा काहीच पर्याय नसल्यानं मला पोलिसांचं सहकार्य घ्यावं लागेल असं म्हटलं आहे. ते म्हणाले, ''या तक्रारीसंदर्भात आमची 'वास्तु' च्या लॉबीमध्ये मीटिंग झाली. त्यावेळी लग्नाची व्यवस्था पहाणाऱ्या कंपनीच्या काही सदस्यांनादेखील या मीटिंगला आम्ही बोलावलं. पोप्लाई(सेक्रेटरी) पुढे म्हणाले,''मीडियाला माहित आहे की पाली हिलच्या रस्त्यांवर खूप उतार आहेत. खूप स्पीडब्रेकर आहेत इथे. अशावेळेला जेव्हा वेगवेगळ्या स्पॉटवर उभ्या असलेल्या मीडियाच्या सदस्यांची झुंबड उडते तेव्हा गाडी कंट्रोल करणं अशक्य होतं. चुकून अपघातही होऊ शकतो. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे असंच सुरू आहे. आम्ही ही तक्रार केवळ सुरक्षेपोटी आणि कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून करीत आहोत''. असंही ते आपल्या निवेदनात म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT