Randeep-Lin Unseen Wedding Video: 
मनोरंजन

Randeep-Lin Wedding Video: लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नाच्या पाच दिवसानंतर रणदीप अन् लिनने शेअर केला लग्नाचा व्हिडिओ..

Vaishali Patil

Randeep-Lin Unseen Wedding Video: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांनी 29 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर रणदीपने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत आपल्या लग्नाची घोषणा केली आणि अतिशय पांरपारिक पद्धतीने लिनसोबत लग्न केले.

रणदीप - लिन या दोघांनी 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे त्यांच्या जवळच्या सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले. रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी महाभारतातील कल्पना घेऊन पौराणिक थीम असलेली लग्नाची योजना आखली होती आणि तसाच दोघांचा भव्य लग्न सोहळा देखील पार पडला.

लग्नानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टीही दिली होती. सध्या दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.

या व्हिडिओमध्ये दोघांच्या लग्नाचे कपडे, दागिने आणि सर्व विधी चाहत्यांना पाहायला मिळतात. दोघांनीही मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळत आहे.

या व्हायरल व्हिडिओची सुरुवात लग्नाआधीच्या समारंभात लिनने परिधान केलेले सोन्याचे दागिने आणि गुलाबी रंगाच्या साडीपासून होते. नंतर रणदीपचा लग्नाचा पोशाख दिसतो. त्यानंतर वधूचे कुटुंब रणदीपला लग्नाच्या ठिकाणी आणतात. दोघांनी आपल्या प्रथा आणि परंपरा जपत लग्नगाठ बांधल्यामुळे चाहते खुप खुश आहेत.

यासोबतच रणदीप आणि लिनने त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. हे रिसेप्शनचे फोटो होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, "'मी' ते 'हम' पर्यंतचे आनंदी आयुष्य." सध्या दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT