ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर Randhir Kapoor हे नुकतेच नवीन घरात राहायला गेले आहेत. वांद्रे या ठिकाणी नवीन घरात ते राहत आहेत. पत्नी आणि मुली करीना कपूर खान Kareena Kapoor Khan आणि करिश्मा कपूर Karisma Kapoor यांच्या जवळ राहता यावं यासाठी त्यांनी वांद्रे इथं राहण्याचा निर्णय घेतला. आधी ते मुंबईतील चेंबूर याठिकाणी राहायचे. 'चेंबूरमधील घरात एकटं वाटायचं. आता कुटुंबीयांच्या जवळ येऊन बरं वाटतंय', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यासोबतच चेंबूरचं जुनं घर विकणार का, असा प्रश्न विचारला असता, 'अजून माझी परिस्थिती इतकी वाईट नाही की घर विकावं लागेल', असं उत्तर त्यांनी दिलं. रणधीर कपूर यांचं नवीन घर ३ हजार चौरस फुटांचं आहे. (Randhir Kapoor on shifting from his old house and selling his Chembur house)
शुक्रवारी रणधीर यांनी गृहप्रवेशाची पूजा केली आणि यावेळी करीना, करिश्मा, नीतू कपूर, रिधिमा कपूर सहानी आणि आदर जैन हे सर्व उपस्थित होते. 'नवीन घरात मला खूप बरं वाटतंय. जुन्या घरात मला खूप एकटेपण वाटत होतं. या घरी माझे कुटुंबीय कधीही मला भेटायला येऊ शकतात. पूजेलासुद्धा सर्वजण घरी आले होते, तेव्हा मला बरं वाटलं. माझे काही मित्रसुद्धा खार आणि वांद्रे परिसरात राहतात', असं रणधीर कपूर म्हणाले.
जुनं घर विकण्याबाबत ते पुढे म्हणाले, 'नाही, माझी परिस्थिती इतकी वाईट नाही. ते घर तसंच राहील. ते घर फार मोठं आहे आणि इतक्या मोठ्या घरात मला एकटेपण वाटत होतं, म्हणून वांद्र्याला राहण्याचा निर्णय घेतला.' रणधीर कपूर यांचे बंधू ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. राजीव आणि रणधीर कपूर हे चेंबूर इथल्या वडिलोपार्जित घरात एकत्र राहायचे. मात्र राजीव यांच्या निधनानंतर रणधीर यांना त्या घरात एकटेपण जाणवत होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.