Ranveer Singh Calls Johnny Depp esakal
मनोरंजन

Ranveer Singh : 'जे काही शिकलो ते तुमच्याकडूनच'! रणवीरचा गुरु कॅप्टन 'जॅक स्पॅरो'? केला मोठा खुलासा...

युगंधर ताजणे

Ranveer Singh Calls Johnny Depp - बॉलीवूडचा अतरंगी अभिनेता म्हणून रणवीर सिंगकडे पाहिले जातं. तो त्याच्या एनर्जीटीक भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे, स्टाईलमुळे तो बऱ्याचदा चर्चेतही येतो, ट्रोलही होतो पण रणवीर आपल्याला जे योग्य वाटतं ते केल्याशिवाय राहत नाही. या कारणामुळेच की काय त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याच्या नावाची क्रेझही मोठी आहे.

सध्या रणवीर सिंग हा रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून चर्चेत आला आहे. त्या महोत्सवामध्ये त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना रणवीरनं त्या अभिनेत्याचे नाव घेतले आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. यावेळी रणवीरनं हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपला आपला आदर्श मानलं असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मी जेव्हा त्या अभिनेत्याला पाहिलं तेव्हा त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, त्याचा अभिनय प्रेरणादायी आहे. असे रणवीरनं म्हटलं आहे.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

हॉलीवूडचा तो अभिनेता जॉनी डेप आहे ज्याचं नाव रणवीरनं घेतलं आहे. पायरेट्स ऑफ कॅरेबियन फेम जॉनीला रणवीर आदर्श मानतो. त्यानं त्याचं कौतुक केलं आहे. रेड सी फिल्म महोत्सवामध्ये हॉलीवूड आयकॉन शेरोन स्टोनकडून रणवीरला पुरस्कार मिळाला. सोशल मीडियावर त्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीरनं म्हटलं आहे की, मला खूप आनंद होतो आहे तो म्हणजे मी माझ्या आयडलला पाहतो आहे. मी एडवर्ड सिजरहँडस आणि व्हाईट इटिंग गिल्बर्ट ग्रेप यांच्यानंतर तुम्हाला फॉलो करतो. तुमच्या अभिनयाचा चाहता आहे. या सोहळ्यात मला पुरस्कार मिळणे ही खरचं अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल मी आयोजकांनाही धन्यवाद देतो. मला प्रेरित करण्याचे काम जॉनी डेप यांच्या चित्रपटांनी केले. अशा शब्दांत रणवीरनं त्याचं मनोगत व्यक्त केलं आहे.

यानंतर रणवीरनं जॉनी डेप यांच्यासोबत एक फोटोही शेयर केला आहे. रणवीरच्या त्या पुरस्कार सोहळ्यातील लूकचे देखील कौतुक होत आहे. शेरोन स्टोन यांनी रणवीरला पुरस्कारानं सन्मानित केले. स्टोननं यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, यापूर्वी देखील रणवीर सिंगला भेटलो आहे. तो चांगला व्यक्ती आहे. अष्टपैलु अभिनेता म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. अभिनेता म्हणून त्याची लोकप्रियताही मोठी आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाल्यास त्याच्या गेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात आलिया भट्ट सोबत त्यानं स्क्रिन शेयर केली होती. याशिवाय शबाना आझमी, जया बच्चन, धर्मेंद्र यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. आता तो लवकरच रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT